Headlines

Ahmedabad London Air India Plane Crash Cabin Crew Deepak Pathak Family devastated; …तर आमचा दीपकही वाचला असता का? क्रू मेंबर पाठकच्या निधनानं आई खचली, रडून डोळ्यांचा आजार, वस्तू पाहून जखमा खोल


Air India Crash Victim Deepak Pathak Family : एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक विमान अपघातात मृत्युमुखी पडले, त्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Ahmedabad Air India Plane Crash Deepak Pathak Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : एअर इंडियाच्या विमान अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या बदलापूरच्या पाठक कुटुंबाचे दुःख वर्षभरानंतरही कायम आहे. अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले तरी दीपक पाठक यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांचे आईवडील अद्याप सावरलेले नाहीत. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींशी झुंज देत असलेल्या या कुटुंबाची वेदना आजही तितकीच तीव्र आहे.

आधी मुलीचे निधन, मग मुलाचे

एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक अहमदाबाद-लंडन विमान अपघातात मृत्युमुखी पडले होते. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला दीपक गेल्यानंतर पाठक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वर्षांपूर्वी कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे निधन झाल्याने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दीपकच्या मृत्यूने ते पूर्णपणे कोलमडले.
Maharashtra TimesAir India Crash : अहमदाबाद लंडन विमान अपघाताचा रिपोर्ट वर्षभरानंतरही नाहीच, सुधारणा कशा करायच्या? पायलट-तंत्रज्ञांची खंत

रडून-रडून डोळ्यांचा आजार

दीपकच्या निधनानंतर त्याची आई गंभीर मानसिक तणावाखाली गेली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरात त्यांना चारवेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. रडून-रडून त्यांच्या डोळ्यांचा आजारही वाढला आहे. झोप न लागल्याने त्यांना रोज झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात. वयोवृद्ध वडिलांचीही प्रकृती खालावलेली असून दोघेही बहुतांश वेळा अंथरुणावर असतात. रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पेन्शनवर घराचा काहीसा खर्च भागतो. मात्र वाढते वैद्यकीय खर्च, औषधोपचार आणि घरगुती गरजा यामुळे आर्थिक ओढाताण वाढत चालली आहे.

धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, तटकरेंना इशारा; अंजली दमानियांकडून सुनेत्रा पवारांची स्तुती

आर्थिक अडचणींना तोंड

महिन्याला लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च होत असल्याचे हे कुटुंबीय सांगतात. दीपकची मोठी बहीण श्रुतिका गेल्या वर्षभरापासून आई, बाबांचा आधार ठरली आहे. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी तिने आपली नोकरी सोडली. पती आणि लहान मुलासह ती बदलापूरमध्ये स्थलांतरित झाली असून गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचणींना तोंड देत ती कुटुंबाचा आधार झाली आहे. दीपकच्या वापरातील साहित्य असलेली बॅग मार्चमध्ये या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यात दीपकचे कपडे, जीन्स, शूज, चप्पल, बँकेचे पासबुक आणि काही नोटा होत्या. मात्र आई, बाबांची मानसिक स्थिती पाहता चार महिन्यानंतर त्या बॅगेतील साहित्य आई, बाबांना दाखवल्याचे श्रृतिका सांगते. या वस्तू पाहून कुटुंबीयांच्या जखमा आणखी खोल झाल्या.
Maharashtra TimesBadlapur Crime : कॅबमध्ये ओळख, बदलापूरची विवाहिता आणि चालकाची बॉडी गाडीत सापडली, लहान मुलाने गाडीतून उतरुन नातेवाईकांना सांगताच हलकल्लोळ

आमचा दीपकही वाचला असता का?

जिवंत माणसांचे कोळसे झाले, तेव्हा ही बॅग इतकी सुस्थितीत कशी राहिली? ही बॅग जशीच्या तशी राहू शकते, तर आमचा दीपकही वाचला असता का?” असा भावनिक प्रश्न श्रुतिका विचारते. दीपकच्या मृत्यूनंतर एअर इंडियाकडून काही महिन्यांनी तात्पुरती आर्थिक मदत मिळाली. मात्र अपघातानंतर मिळणे अपेक्षित असलेली मुख्य आर्थिक मदत अद्याप मिळालेली नसल्याचे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मदतीच्या प्रक्रियेत सातत्याने कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा