Headlines

ABMCM Election: वर्षा उसगावकर, शिंदे, खोचीकर बिनविरोध? चित्रपट महामंडळ निवडणुकीत आज माघारीचा दिवस – all india marathi film corporation elections withdraw applications last day on today 28 may 2026


ABMCM Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी आज, २८ मे २०२६ शेवटचा दिवस आहे.

varsha usgaonkar
उसगावकर, शिंदे बिनविरोध?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२८) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड होण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब होणार आहे.

चित्रपट महामंडळाच्या १७ जागांसाठी ६० अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे विविध आमिषे आणि दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई यासह राज्यातील विविध भागांतील पडद्यामागचे आणि पडद्यावरचे कलावंत या निवडणुकीत उतरले आहेत.

Maharashtra TimesMaharashtra Politics : राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं मिळावं, सुनेत्रा पवारांकडून अपेक्षा व्यक्त? फडणवीसांनी मौन सोडलं, अशी कोणतीही मागणी…
मावळते अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तयार होणार असून, दुसरे पॅनल कुणाचे याची उत्सुकता आहे. गुरुवारनंतरच या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.

नीलम शिर्केंनी घेतली माघार
अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून माघार घेतली. वर्षा उसगावकर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचे नाही, कोणतेही राजकारण करायचे नाही असे कारण देऊन नीलम यांनी माघार घेतली. मात्र, यामागे खरं कारण का? हा चर्चेचा विषय बनला आहे.

Maharashtra TimesChandrashekhar Bawankule: सपकाळांना राज्यात फिरु देणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, असं का म्हणाले?
‘पाच ठिकाणी मतदान सुविधा हवी’

अभिनेत्री या गटात अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अचानक माघार घेतल्याने वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. याशिवाय संकलन विभागात विजय खोचीकर, तर गायन विभागात आनंद शिंदे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे सावंतवाडी आणि नागपूर या पाच ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेघराज भोसले यांनी केली आहे

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा