Today’s Gold-Silver Rates 29 June 2026: सोने आणि चांदीच्या बाजारात उलट ट्रेंड सुरू झाला आहे. जागतिक घडामोडींचा देशांतर्गत सोनं- चांदीच्या दरांवर परिणाम स्पष्ट दिसून येत असून एकीकडे देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीचे गुंतवणूकदार माघारी फिरत आहेत तर, आता सोन्याचे भाव कोसळण्याच्या भीतीमुळे भारतातील लोकांनीही नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. परिणामी सराफा बाजरातील किमतींनाही उतरती कळा लागली आहे.

सोने-चांदीचा आजचा दर काय
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात नव्याने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तेलाचे भाव वधारले ज्यामुळे अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेला बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर MCX वर सोन्या आणि चांदीच्या दरांनी घसरणीच्या दिशेने कूच सुरूच ठेवली.
US Iran Tension: होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
सोमवार, जून रोजी, सकाळी 9:15 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज – MCX – वर सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स 0.40 टक्के घसरून 1,43,583 रुपये 10 ग्रॅमवर कमी झाले तर चांदीचा सप्टेंबर वायदा भाव 0.26 टक्के घसरणीसह 2.22 लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
भारतीयांकडून जुन्या सोन्याची विक्री
सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीचा कल सुरूच असून पुढेही आणखी घसरणीचा अंदाज आहे. जून महिन्यात सोन्याची किंमत 15,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे तर, चांदीची चकाकी देखील 45,000 रुपयांनी उतरली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती आणखी खाली येण्याचा अंदाज असून या दरम्यान, भारतीय कुटुंबे जुने सोने विकून कॅश मिळवण्यासाठी घाई करत आहेत. IBJA ने सांगितले की ग्राहकांनी एप्रिल-जून तिमाहीत जवळपास 50 टन जुने सोने विकले, जे गेल्या वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत 43% जास्त आहे.
LPG Cylinder New Rule : 1 जुलैपासून नियम बदलणार, या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन थेट बंद होणार
सोने-चांदीची किंमत आणखी किती घसरणार
सध्या देशांतर्गत बाजारात 1.40 लाखांच्या आसपास व्यवहार करणाऱ्या सोन्याची किंमत 1.2 लाख रुपयांवर कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे अनेक ग्राहक घरातील जुन्या दागिने देऊन नवीन दागिने घेण्याऐवजी विकून रोख रक्कम मिळवून नफा कमावत आहेत. ईटीच्या एका अहवालानुसार, IBJA चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, “भारतीय ग्राहक सोन्याच्या वाढलेल्या किमतींचा फायदा घेऊन एनकॅश करत आहेत.” या हालचालींमुळे भारतातील संघटित सुवर्ण पुनर्वापर उद्योगालाही चालना मिळत असून वाढत्या किमतींमुळे लोक सोने घरी साठवून ठेवण्याऐवजी पुनर्वापर करत आहेत.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

