Headlines

Beed Limbaganesh Killed of 27 Year Old Youth Case Registered Against Unknown Person; ‘मी माझं काम करुन आलो…’; लेक पुन्हा परतलाच नाही, ग्रामस्थांनी घरच्यांना सांगितलं, तरुणाला निर्घृणपणे संपवलं


Beed Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Beed Crime News
बीड लिंबागणेश तरुणाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड : लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणावरून पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघाताचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र गळ्यावरील व्रण पाहिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराबाहेर पडला पण पुन्हा परतला नाही

किरण बंडू सोनवणे (वय 27, रा. अंजणवती, ता. जि. बीड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा भाऊ महेश बंडू सोनवणे (वय 27, रा. अंजणवती) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, किरण हा 31 मे रोजी संध्याकाळी लिंबागणेश येथे काम असल्याचे सांगून मोटारसायकलवरून घराबाहेर पडला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु त्याचा पत्ता लागला नाही.
Maharashtra TimesBuldhana Crime : बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी
1 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समाधान कांबळे या ग्रामस्थाने फिर्यादीला उठवून माहिती दिली की, किरणचा लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यावरील नाल्यात अपघात झाला आहे. फिर्यादीने तत्काळ नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे किरण हा मृत अवस्थेत पडला होता आणि त्याच्या अंगावर मोटारसायकल पडलेली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोटारसायकल बाजूला केली असता, किरणच्या गळ्याला पांढऱ्या रंगाचा पट्टा आणि काळसर रंगाचे व्रण दिसून आले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याचा गमछ्याने गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून अपघात झाल्याचा बनाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra TimesPune Crime: पुण्याजवळील गावात पोलिस आणि ATS ची धाड; लॉजमधून सात महिलांची सुटका, तीन बांगलादेशींचा समावेश

मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन

बीड येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आणि अंजणवती येथे त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश भगवत साळवे करीत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा