तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा पाठिंबा, काय केलं पाहा – ashok londhe’s foot march carrying the constitution on his head to support tukaram mundhe’s action
तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा पाठिंबा, काय केलं पाहा – ashok londhe’s foot march carrying the constitution on his head to support tukaram mundhe’s action
राज्यातील अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाई सुरू करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय…याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत भर उन्हात श्रीरामपूर ते शिर्डी अशी ३० किलोमीटर पायी पदयात्रा पुर्ण केली.. या पदयात्रेदरम्यान त्यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेत अंगावर संविधान आणि तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ संदेश लिहिलेले पोस्टर परिधान केले होते.राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय…