Headlines

Sanjay Jadhav : संजय जाधव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार? वक्तव्यानं चर्चांना उधाण – shiv sena ubt mp sanjay jadhav on defection



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना सातत्याने उधाण येत आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला संजय जाधव हे गैरहजर राहिले होते. मार्च महिन्यात बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीतही ते गैरहजर होते. यावरुन ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहे. या सर्व चर्चांनंतर संजय जाधव यांच्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत