Headlines

Traffic Advisory Major Route Changes in Nashik from June 30 to July 3


नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान झाले आहे. ही पालखी उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Nashik News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी दोन वाजता निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, नाशिक विधान परिषद आमदार गोकुळ गीते यांच्यासह हजारो वारकरी यावेळी उपस्थित होते. फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ठेवण्यात आली. हरिनामाचा जयघोष करत या सोहळ्याला सुरुवात झाली.

अगदी पहाटेपासूनच वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. समाधी मंदिरापासून सुरू झालेली ही आषाढी वारी पवित्र कुशावर्त कुंडात नेण्यात येऊन तिथे पालखीला स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्र्यंबक नगरीमधून मिरवत श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये काही काळ ती ठेवण्यात देखील आली होती.

नाशिकच्या दिशेला पालखी प्रस्थान होणार

आज या पालखी सोहळ्यानिमित्ताने त्रंबकेश्वरचे वातावरण भगवमय यासोबतच भक्तीमय देखील झाले होते. आज या पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर येथे असणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच ३० जून रोजी नाशिक शहराकडे ही पालखी प्रस्थान होणार आहे.

वारकरी मोठ्या संख्येत सहभागी होणार

पादुकांचे पूजन होऊन पुढे नाशिकच्या सातपूर येथे या वारीचा मुक्काम असणार आहे. शहर परिसरात देखील या वारीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत होणार आहे. मोठ्या संख्येने या पालखी प्रस्थान सोहळ्यात वारकरी हे सहभागी झाले आहेत. जसजशी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने मोठ्या संख्येने आणखी भाविक या पालखी सोहळ्यात जोडले जाणार आहेत. अत्यंत भक्तिमय वातावरण या दरम्यान अनुभवायला मिळते.

३० जून पासून ३ जुलैपर्यंत नाशिकमध्ये वाहतुकीत बदल

दरम्यान, या काळात जेव्हा पालखीचे शहरातून प्रस्थान होणार असल्याने शहर पोलिसांकडून विविध वाहतूक मार्गांमध्ये बदल केले जाणार आहे. या कालावधीत पालखी सोहळ्यानिमित्ताने ३० जून ते ३ जुलै २०२६ कालावधीत हे वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहे. वारकऱ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेता शहरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही अधिसूचना पोलिसांकडून काढण्यात आली आहे.

३० जून ते १ जुलै

३० जून ते १ जुलै दरम्यान शहरातील त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल ते संस्कृती हॉटेल दरम्यानच्या डाव्या बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. मायको सर्कल ते ABB सर्कल दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक बंद राहणार आहे.

१ जुलै ते २ जुलै

शहरातील मोडक सिग्नलकडून अशोकातस्तंभ ते जाणारी वाहतूक तसेच अशोकस्तंभ ते रविवार कारंजा आणि महात्मा फुले मार्केट ते काजीपुरा चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

२ जुलै ते ३ जुलै

द्वारका आणि काठेगल्लीकडून नाशिकरोडकडे जाणारी एकतर्फी वाहतूक ही बंद असणार आहे. नाशिकरोडकडून द्वारकाकडे येणाऱ्या मार्गावरील दुहेरी वाहतूक चालवली जाणार आहे. तसेच जड वाहन आणि एसटी बसेस दत्तमंदिर चौकाकडून वीर सावरकर पुलावरुन सिन्नर फाट्याकडे वळवण्यात येणार आहे.

खालील वाहनांना या काळात सवलत असणार

ही सर्व निर्बंध दिंडीतील वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल वाहने आणि अँब्युलन्स यांना लागू राहणार नाहीत. या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा