Headlines

Bhandara State Tax Inspector caught red-handed arrested while accepting the bribe of 35,000 rupees; बंद पडलेला GST क्रमांक सुरू करण्यासाठी पैसे मागितले, राज्य कर निरीक्षकाला सापळा रचून अटक; लाच घेताना…


GST Office Bribe Case : शहरात एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकारी लाच घेताना पोलिसांनी मोठी कारवाई केली.

bhandara news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भंडारा : राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांनी त्यांच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वत: स्वीकारली. लाच स्वीकारताना, त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने लाच घेतली

बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी 35 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू व कर विभागाच्या (जीएसटी) राज्य कर निरीक्षकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी भंडारा येथील वस्तू व कर विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
Maharashtra TimesMantralay News : मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ दिसणार नसल्याने सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; आता थेट…

जीएसटी विभागाला ऑनलाइन अर्ज, पण GST क्रमांक सुरू झाला नाही

मनीष मुरलीधर सहारे (50) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर 2025 पासून बंद आहे. हा क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी 2 नोव्हेंबर 2025 रोजी जीएसटी विभागाला ऑनलाइन अर्ज सादर केला होता. यानंतर त्यांना जीएसटी विभाग नागपूर येथून त्यांच्या फर्मचे लेझर शीट बनवून त्याप्रमाणे चालान भरून पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यावर तक्रारदार यांनी लेझर शीट तयार करून 10 हजार 428 रुपये चालान भरले.
Maharashtra TimesBeed News : आधुनिक शेतीच्या माहितीसाठी कृषी प्रदर्शनाला गेले, पण वाटेत काळाचा घाला, तरुण शेतकऱ्यांचा करुण अंत, अख्खं गाव हळहळलं

बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी मागितली लाच

यानंतर तक्रारदार यांनी वस्तू व सेवा कर विभाग भंडारा येथील राज्य कर निरीक्षक सहारे यांची भेट घेतली व त्यांचा जीएसटी क्रमांक अद्याप सुरू झाला नसल्याबाबत सांगितले. तेव्हा सहारे यांनी तक्रारदार यांना त्यांचा बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली.

Jalna Municipal Corporation च्या प्रभारी आयुक्तांना लाच घेताना रंगेहात अटक; ACB ची मोठी कारवाई!

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 15 जानेवारी रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 16 जानेवारी रोजी पथकाने सहारे यांच्या कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याचे दिसून आले.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.आणखी वाचा