Headlines

Nilesh Rane : आमसभेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, निलेश राणेंकडून संताप व्यक्त – at the meeting, administrative officers was absent; nilesh rane expressed anger.



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार निलेश राणे यांच्या कुडाळ येथे झालेल्या आजच्या आमसभेत लेट कमर्स अधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. कुडाळमध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण आमसभेत प्रशासकीय गलथानपणा उघडकीस आला. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही, अनेक जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने आमदार निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत