Dhule Municipal Corporation Election 2025 BJP Ujjwala Bhosale Elected Unopposed as corporator; दोन दिवसांपूर्वी NCP मधून BJP मध्ये, तिकीट मिळताच कंबर कसली, विरोधकांची माघार; उज्ज्वला भोसले बिनविरोध
Dhule Municipal Corporation Election 2025 BJP Ujjwala Bhosale Elected Unopposed as corporator; दोन दिवसांपूर्वी NCP मधून BJP मध्ये, तिकीट मिळताच कंबर कसली, विरोधकांची माघार; उज्ज्वला भोसले बिनविरोध
Dhule Municipal Corporation Election : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपलं खातं उघडलं असून भाजपच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
धुळे उज्ज्वला भोसले बिनविरोध निवड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, धुळे : धुळे जिल्ह्यात काल बुधवारी झालेल्या अर्ज छाननीअंती प्रभाग क्रमांक 1 (अ) मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजीत भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर, प्रभाग 6 (ब) मधूनही भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यादेखील बिनविरोध निवडून आल्या. जळगाव महापालिकेतही महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक 12 (ब) मधून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे, प्रभाग क्रमांक 1 (अ) मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजीत भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादीतून (शरद पवार गट) भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अर्ज चुकीचा भरला
जळगावच्या 12 (अ) मधून अनिल अडकमोल, 12 (ब) मध्ये उज्वला बेंडाळे, 12 (क) मधून गायत्री इंद्रजीत राणे, 12 (ड) मध्ये नितीन मनोहर बरडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. छाननीदरम्यान प्रभाग 12 (ब) मध्ये भाजपातर्फे उज्वला बेंडाळे, अपक्ष वैशाली पाटील व भारती चोपडे यांचे अर्ज शिल्लक होते. चोपडे यांनी अर्ज चुकीचा भरल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला. तर वैशाली पाटील यांनी प्रभाग 12 मधील इतर तीन वार्डातून देखील अर्ज भरले होते. त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा ब आणि ड मधील अर्ज बाद झाला. त्यामुळे 12 (ब) मध्ये उज्वला बेंडाळे या आता एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. Pune Elections: पुण्यात शिवसेनेत अजब गोंधळ, आपल्याच पक्षातील उमेदवाराचा ‘बी’ फॉर्म गिळला; नेमकं काय घडलं?
एकमेव अर्ज शिल्लक
धुळे महापालिकेत प्रभाग 1 (अ) मधील अर्जछाननी दरम्यान भाजपच्या उमेदवार उज्ज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रभाग 1 (अ) सह (ब) मधूनही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे दोन्हींतील कोणता अर्ज कायम ठेवावा अशी विचारणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार कल्पना धुमाळ, सुनीता पाटील यांनी प्रभाग (अ) मधून अर्ज माघारी घेतला आणि (ब) मधून उमेदवारी कायम ठेवली. भोसले यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्या निवडून आल्या. प्रभाग 6 (ब) मधून भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांच्यासमोर भाजपच्या वैभवी दुसाने आणि राष्ट्रवादीच्या आरती पवार यांचे उमेदवारी अर्ज होते. दोघींनी माघार घेतल्याने पाटील निवडून आल्या. Ahilyanagar Crime : श्रीरामपूर शहरात भरदिवसा गोळीबाराचा थरार, अंत्यविधी ओटोपून घरी निघालेल्या बंटी जहागीरदार यांना संपवलं
निवडीचा मार्ग मोकळा
दरम्यान, मालेगाव येथील मनपाच्या प्रभाग क्रमांक 6 मधील (क) गटातील सर्वसाधारण जागेसाठी इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये ‘एमआयएम’च्या उमेदवार समीना अन्वर हुलहक यांनी एकाच जागेसाठी दोन नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी एक अर्ज माघारी घेतल्यामुळे मुनिरा शेख यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा