Headlines

two man die on the spot after lightning strikes on running bike 17 yrs old boy injured in wardha; वर्ध्यात धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; काका-पुतण्याचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी


Wardha News: धावत्या दुचाकीवर वीज कोसळून काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी आहे.

वीज
वीज(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्ध्याच्या सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना दुचाकीवरच वीज कोसळली. यात काका आणि पुतण्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान घडली.

भिवापूर येथील अनिल ठाकरे हे १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे निघाले होते. वाटेतच पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर येताच त्यांच्या दुचाकीवर वीज पडली. यात अनिल आणि त्यांचा पुतण्या सौरभ हे जागीच ठार झाले. मुलगा वेदांत हा गंभीर जखमी झाल्याने त्याला हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra TimesWardha News : भीषण! ट्रक आणि कार मध्ये जोरदार धडक, कारचा चेंदामेदा अन् वृद्धेसह एकाचा वेदनादायी अंत
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा :
शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी तुमसर तालुक्यातील सोदेपूर येथे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. रघुनाथ इसन उईके (५६) रा. सोदेपूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोदेपूर परिसरात ४ वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रघुनाथ हे आपल्या शेतावर काम करीत होते. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस आणि महसूल विभागाने या घटनेची नोंद केली आहे
Maharashtra Timesमराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ पाच जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?
धामणगाव रेल्वेत चार महिला जखमी
अमरावती :
वीज पडून चार महिला जखमी झाल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात घडली. जखमींमध्ये दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पिंकी प्रमोद बनसोड ( ४०), मीना नामदेव आत्राम (३५), शारदा प्रवीण कुडमते ( ३०)व नंदा दिलीप ठाकरे ( ३०) अशी जखमींची नावे आहेत. यातील पिंकी आणि मीना या गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या सर्व महिला शुक्रवारी दुपारी शेतात काम करीत होत्या. अचानक पावसाला सुरुवात होऊन वीज पडल्याने चौघी जखमी झाल्या.

दरीत कोसळून डॉक्टरचा मृत्यू
बुलढाणा
: ड्युटी संपल्यानंतर ‘आमदरी पॉइंट’जवळ फिरायला गेलेले डॉ. शुभम जगताप (वय २८) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे मंगळवारी ही घटना घडली. मृत डॉक्टर सावळा गावचे होते. ते तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा