Headlines

Mahayuti Rebel Candidates Withdrawal Nomination But Mahavikas Aghadi Two Candidates in Parbhani Hingoli MLC Election


परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी सुरु आहेत. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी बडे नेते आज परभणीत आले. महायुतीच्या नेत्यांना बंड शमवण्यात यश आलं. पण महाविकास आघाडीत बिघाडी झालेली बघायला मिळाली.

Parbhani Politics
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : राज्यामध्ये विधान परिषदेच्या 17 पैकी 8 जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश मिळाले आहे. परभणी-हिंगोली विधानपरिषद मतदारसंघात देखील महायुतीमध्ये झालेली बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना यश मिळाले आहे. परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटली होती. पण तरीदेखील राष्ट्रवादीच्या दोन आणि भाजपच्या एकाने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन आणि भाजपच्या एका बंडखोराने आपली उमेदवारी वापस घेतल्याने परभणी जिल्ह्यात महायुतीमध्ये एकजूट दिसून आली.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली होती. पण काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज वापस न घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच कळमनुरचे आमदार संतोष बांगर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय जामकर आणि संग्राम जामकर या दोघांनी, तर भाजपच्या विश्वजीत बुधवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचा एकच उमेदवार सईद खान हे उभे आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सुटली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. पण त्याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र सुशील देशमुख यांनी देखील बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुशील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज वापस घेतला जाईल, अशी चर्चा होती. ते मात्र शक्य झाले नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट होणार हे मात्र निश्चित झाले आहे. अगोदरच या मतदारसंघात महाविकास आघाडीची मतं कमी असताना देखील दोन-दोन उमेदवार उभे ठाकल्याने महाविकास आघाडीमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

आता होणार तिरंगी लढत

परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सईद खान हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे बंडखोर काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र सुशील देशमुख हे देखील अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे आता परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या तिघांमध्ये कोण बाजी मारेल हे मात्र आता निकालानंतर स्पष्ट होईल.

सध्या तरी महायुतीकडे पूर्ण बहुमत आहे आणि त्याचबरोबर महायुतीमधील बंडखोरी देखील थंड झाली आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे मात्र सांगता येणार नाही. निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.

मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

“उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परभणी येथे महायुतीच्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर कडाडून टीका केली. कोकणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेली 42 मते देखील महायुतीच्या उमेदवाराला पडतील”, असे म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा