Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जत महावितरण कर्मचारी संतोषकुमार हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील संख येथे महावितरणच्या वसुली कर्मचाऱ्याची त्याच्या राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना काल मध्यरात्री घडली होती. या घटनेने संख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. महांतेश मल्लया स्वामी (वय 35, रा.दरिबडची ता.जत आणि रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे (वय 22, रा. 100 फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी पोळ मळा विश्रामबाग. सध्या. रा.जाडरबोबलाद, ता.जत) या आरोपींना उमदी पोलिसांनी अटक केली आहे.
उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासात कोणताही पुरावा उपलब्ध नसताना मुख्य मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. घटनास्थळी उमदी पोलिसांनी पंचनामा करून सांगली सिव्हिल येथे शवविच्छेदन करण्यात आलं. पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. संतोषकुमार बिरादार यांच्या मृत्यूनं संख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Sangli News : भावाचा नादच खुळा! दहावीत सर्व विषयांत 35 मार्क्स, गावात बॅनरबाजी; सांगलीत सोशल मीडियावर गजूभाईचीच चर्चा दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पो.उ.नि. बंडू साळवे, दिनेश धसाडे, सिद्धेश्वर गायकवाड, पो. हे. कॉ. संतोष माने, लक्ष्मण बंडगर ,कावेरी मोठे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशुराम देशमुखे, छाया बाबर, रेणुका कुंबरे, सोपान बंडे, सुदर्शन खोत यांनी ही कारवाई केली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा