सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी सहभागी झालेले. खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत या लढाईत सहभागी झालेले दिसले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुढचा मोर्चा हा मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली.