सातारा-सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला. मसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. पिकअप विहिरीत पडल्याने या दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. याप्रसंगी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण देवदूतासारखा धावून आला. चिमुकल्याला पाण्यात बुडताना पाहून इरफान यांनी थेट पाण्यात उडी घेतली. यानंतर इरफान यांनी इतर प्रवाशांनाही ग्रामस्थांच्या मदतीने वाचवले. इरफान यांनी पाच जणांचे जीव वाचवले तर दोन पुरुष पोहत बाहेर आले.