Headlines

maoists announces unilateral ceasefire and appealed to central govt to stop action; माओवाद्यांकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा; कारवाई थांबविण्याचे केंद्र सरकारला आवाहन


Gadchiroli News: माओवाद्यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली असून, केंद्र सरकारकडे कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

gadchiroli maoist news
gadchiroli maoist news(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: मागील काही काळापासून सुरक्षा दलांकडून सर्व बाजूंनी कोंडी होत असल्यामुळे माओवाद्यांनी मंगळवारी रात्री एक पत्रक काढत एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभयच्या नावाने हे पत्रक जारी करण्यात आले. कायमस्वरूपी शस्त्रे खाली ठेवण्याचे संकेतही या पत्रकातून देण्यात आले आहेत.

देवजी या जहाल माओवाद्याने दोनच दिवसांपूर्वी संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आल्याने सुरक्षा दले या घडामोडींकडे सावधपणे बघत आहेत. भूपतीने जारी केलेल्या पत्रकासोबत स्वतःचे छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध केले आहे, हे उल्लेखनीय. ‘आम्ही कायमस्वरूपी शस्त्रे खाली ठेवण्यास तयार आहोत. मात्र, त्यासाठी आम्हाला केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चर्चा करायची आहे,’ असे भूपती याने या पत्रकात म्हटले आहे.
Maharashtra Timesसर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची दिल्लीला जाण्याची घोषणा
आत्मसमर्पणाशी संबंध ?
माओवाद्यांच्या संघटनेत अलीकडेच नेतृत्वबदल झाला असून बसवराजूच्या जागी देवजी माओवाद्यांचे नेतृत्व करीत आहे. देवजीने सूत्रे हाती घेऊन काही तास उलटत नाहीत तोच चार कोटींचे बक्षीस असलेली महिला माओवादी सुजाताने आत्मसमर्पण केले होते. सुजाता ही भूपतीचा भाऊ आणि जहाल माओवादी किशनजीची पत्नी आहे. त्यामुळे सुजाताचे आत्मसमर्पण आणि भूपतीचे पत्रक यांचा काही संबंध आहे का, याची तपासणी केली जात आहे.
Maharashtra Times‘माँ’च्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे कडाडले, ‘हा महाराष्ट्र पेटवण्याचा…’
दोन महिला माओवादी ठार
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापली तालुक्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या. सुमित्रा वेलादी आणि ललिता उर्फ संध्या कोर्स अशी या ठार झालेल्या दोघींची नावे आहेत. छत्तीसगड सीमेलगत माओवादी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या गोळीबारात दोन्ही महिला ठार झाल्या

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा