Maharashtra Politics : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेसेनेला धोबीपछाड देण्यासाठी रणनीती आखत दराडेंच्या माध्यमातून थेट एकनाथ शिंदे यांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंनी पराभवानंतरही सूत्रे फिरवत गोकुळ गितेंना सहयोगी सदस्यत्व देत भाजप, राष्ट्रवादीवरच डाव उलटवला

शिवसेनेने चुकीचा उमेदवार निवडल्याचे कारण पुढे करीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेसेनेला धोबीपछाड देण्यासाठी रणनीती आखत दराडेंच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंनीही पराभवानंतर सूत्रे फिरवत गोकुळ गितेंना सहयोगी सदस्यत्व देत भाजप, राष्ट्रवादीवर डाव उलटवला आहे. नाशिकमधील महायुतीतल्या वर्चस्ववादाच्या लढाईत दराडे निवडणूक हरले तरी शिंदेच जिंकल्याचे चित्र आहे. शिंदेंनी उदय सामंतांसोबत चार्टर प्लेन पाठवत गितेंना शिवसेनेच्या ‘गोकुळा’जवळ घेतलं.
भाजपला चेकमेट, शिंदेंचे बेरजेचे राजकारण
शिवसेनेच्या दराडेंचा गोकुळ गितेंनी पराभव केला असला तरी नाशिकचे राजकीय गणित बिघडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला चेकमेट देण्यासाठी बेरजेचे राजकारण खेळले. अपक्ष गिते भाजप, राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आले असले तरी तातडीने सूत्रे हलवत गितेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना चार्टर प्लेन देऊन गितेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. गितेंनी सोमवारी शिंदेंची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व घेतले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीने अस्मान दाखवले असले तरी शिंदेंनी गितेंना आपल्याकडे ओढून परतफेड करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद
गितेंच्या विजयाची कारणे
मतदारांसाठी नवीन चेहरा
बंधू गणेश गितेंचे पाठबळ
प्रचार थांबवला, पण गुप्त प्रचार सुरूच ठेवला
दराडेंच्या रणनीतीला त्याच ताकदीने उत्तर
आर्थिक ताकद
Omraje Nimbalkar : माझी खरी निष्ठा कोणत्याही पद-पक्षाशी नाही, शिवसेना प्रवेशानंतर रात्री 10.49 वाजता ओमराजेंची मोठी घोषणा
दराडेंच्या पराभवाची कारणे
निवडून आल्यानंतर मतदारांशी संपर्क नाही
भाजपसह राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील एका गटाची नाराजी
येवल्यात भुजबळांसोबतचा संघर्ष नडला
प्रचाराऐवजी महायुतीच्या नेत्यांवरच विसंबून राहिले
मतदारांवर अविश्वास
‘हायव्होल्टेज ड्रामा’ निकालापर्यंत कायम
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून सुरू झालेला हायव्होल्टेज ड्रामा निवडणूक निकालापर्यंत कायम राहिला. शिवसेनेतील एका गटासह भाजप, राष्ट्रवादीचा विरोध असतानाही एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. तेथूनच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते.
भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे
वरकरणी ही लढाई दराडे विरुद्ध गिते अशी वाटत असली तरी तिला भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे असे स्वरूप प्राप्त झाले होते. नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेचे वर्चस्व वाढू नये यासाठी भाजपने राष्ट्रवादीला हाताशी धरून शिंदेंचा या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. दराडेंचा भुजबळांशी असलेला वाद पाहता, राष्ट्रवादीच्या मदतीची अपेक्षा नव्हती. मात्र, भाजपने मित्रपक्षाचा केसाने गळा कापत, शिंदेंना रोखण्याची चाल खेळली. त्यामुळे महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
Maharashtra Politics : चौथा ‘संजय’ही धक्का देणार? ठाकरेंच्या तातडीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चा; आता चौघांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण
‘बाप काढला, बाप दाखवला’
विधान परिषद निवडणुकीच्या आधी कुणाल दराडे यांनी गिते बंधूंचा बाप काढल्याची क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपवरून गिते बंधूंनी आक्रमक होत, दराडेंसमोर आव्हान उभे केले. आमचा बाप काढल्याचा आरोप करीत, गितेंनी दराडेंना जेरीस आणले. महायुतीतील नेत्यांच्या दबावामुळे गोकुळ गितेंनी प्रचार थांबवला असला तरी गुप्तपणे रणनीती आखत, दराडेंच्या पराभवाची पायाभरणी केली. दराडेंनी बाप काढला, म्हणूनच त्यांना बाप दाखवल्याचे विजयानंतर गितेंसह त्यांचे समर्थक आता सांगत आहेत.

