Headlines

Akola Police Assistant Sub Inspector Rajesh Jadhav booked for asking favors from Lady Accuse Crime News; पोलीस कोठडीतील आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, ASI राजेश जाधववर गुन्हा, वरिष्ठांनी सर्वांसमोर झापलं


Akola Police ASI Rajesh Jadhav booked : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असा खळबळजनक दावा आरोपी महिलेने लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केला.

Akola Police ASI Rajesh Jadhav Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : पोलीस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ‘शरीरसुखाची’ मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, नोकरी लावण्याच्या बहाण्याने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

या कोठडी दरम्यान महिलेला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. कोठडीत असताना तेथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असा खळबळजनक दावा आरोपी महिलेने लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केला.
Maharashtra TimesKalpana Ashok Kharat : वयात मोठं अंतर, गरिबीतून ऐशोआरामात, सुनीताची ‘कल्पना’ झाली, माहेरशी नातं तुटलं; अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू
ही बाब संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्याने असे नीच कृत्य केल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला. माहिती मिळताच वरिष्ठांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि तेथील संबंधित पोलीस एएसआय राजेश जाधवची चांगलीच कानउघडणी करत त्याला सर्वांसमोर झापले. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भोंदू अशोक खरातच्या विरोधात कृष्णा चांदगुडेंचा २५ वर्षांपासून लढा , आता SIT ला दिली गोपनीय माहिती

Maharashtra TimesRahul Arunoday Banerjee : श्वेता मॅडम पाय घसरुन पडल्या, साडीमुळे अडकल्या; सहअभिनेत्रीचा जीव वाचवताना अभिनेते राहुल बॅनर्जी बुडून ठार, प्रत्यक्षदर्शींचा दावा

तपासाचे आव्हान

महिलेने केलेले शरीरसुखाच्या मागणीचे आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. मात्र ते सूडबुद्धीने केले आहेत की यात खरोखरच तथ्य आहे, याचा तपास करणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस कोठडीत महिला सुरक्षित नसल्याचा संदेश गेल्यास खात्याची मोठी बदनामी होऊ शकते, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा