Parbhani Shiv Sena UBT rebel MP Sanjay Jadhav Y Plus Security after followers get angry; संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडताच शिवसैनिक भडकले, परभणीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; रोष वाढताच केंद्राचा मोठा निर्णय
Parbhani Shiv Sena UBT rebel MP Sanjay Jadhav Y Plus Security after followers get angry; संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडताच शिवसैनिक भडकले, परभणीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; रोष वाढताच केंद्राचा मोठा निर्णय
Parbhani News : शिवसेना खासदार संजय जाधव यांनी सहकारी खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचे पडसाद परभणी जिल्ह्यासह राज्यभरात उमटले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी संजय जाधव हे एका खाजगी विमानाने दिल्लीला गेले आणि त्यांनी सोबत असलेल्या पाच खासदारांसह ठाकरेसेनेपासून फारकत घेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी थेट जाधवांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर मात्र त्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. खासदार जाधव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
जाधवांच्या बंडखोरीचे संमिश्र पडसाद
शिवसेना खासदार संजय जाधव यांनी सहकारी खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल दिवसभर याचे पडसाद परभणी जिल्ह्यासह राज्यभरात उमटले आहेत. खासदार संजय जाधव हे २०१४ पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून देखील मानले जात होते पण त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी का केली म्हणून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर काही जणांनी त्यांच्या बंडखोरीचे समर्थन देखील केले आहे. खासदार संजय जाधव हे सध्या मतदारसंघाबाहेर आहेत. तेपरभणी जिल्हा दौऱ्यावर येण्याअगोदरच त्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. Eknath Shinde : शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची इच्छा पूर्ण होणार? भाजपच्या गोटात चलबिचल
कुठे जोडेमार, कुठे प्रतिकात्मक अंत्ययात्रा
त्यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला. तिथूनच त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ‘गद्दार संजय जाधव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा मोर्चा शहराच्या मुख्य भागात आणला. शहरातील प्रमुख मार्गानं ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला होता.
दरम्यान, खासदार संजय जाधव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देऊन त्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाय प्लस सुरक्षा मध्ये तब्बल अकरा सुरक्षा अधिकारी तैनात केले जातात. त्यामध्ये दोन ते चार कमांडो दर्जाचे अधिकारी असतात. तसेच सशस्त्र पोलीस आणि पीएसओ दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातात. खासदार संजय जाधव यांच्या निवासव्यवस्था आणि प्रवासादरम्यान ही सुरक्षा देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा