Headlines

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न




पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे वरुडपासून जवळच असलेल्या जरुड येथे चार एकर शेती आहे. मागील काही वर्षांत हवामानातील बदल, बाजारातील चढ-उतार आणि संत्र्याच्या निर्यातीवरील परिणाम पाहता त्यांनी बारामती परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून संत्राबागेत आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. पानाचे उत्पादन अधिक खेरडे यांनी संत्राबागेत मोरिंगाच्या ‘वलय पट्टी’ प्रकाराची तसेच लक्ष्मीतरू, बीट या वनस्पतीचीही लागवड केली. या प्रकारात शेंगांपेक्षा पानांचे उत्पादन अधिक मिळते. मोरिंगाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. वर्षातून तीनवेळा पानांची कापणी केली जाते. ही पाने सुकवून त्यांची पावडर तसेच टॅबलेट तयार करून विक्री केली जाते. ऑनलाइन माध्यमातूनही या उत्पादनांची अजिंक्य खेरडे विक्री करत आहेत. मोरिंगा पावडरचे आर्थिक गणित मोरिंगाच्या पानांची वर्षातून तीन वेळा कापणी करता येते. सुकवलेल्या पानांची पावडर सरासरी किमान 200 रुपये प्रतिकिलो विकली जाते. अजिंक्य यांनी चार एकर क्षेत्रात मोरिंगाची लागवड केली. आंतरपीक पद्धतीतून पहिल्या कापणीत सुमारे एक क्विंटल, दुसऱ्या कापणीत 130 किलो आणि तिसऱ्या कापणीत 150 किलो उत्पादन मिळाले. चौथ्या कापणीत यापेक्षाही अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. लक्ष्मीतरू या वनस्पतीतील औषधी गुणधर्मांमुळे याच्या पावडरला 5 ते 7 हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. अजिंक्य यांनी आपल्या बागेत लक्ष्मीतरूची 54 झाडे लावली. यासोबतच ते संत्राच्या सालेपासून पावडरही तयार करतात. शेतातच प्रक्रिया उद्योग शेतातच उभारला प्रक्रिया उद्योग मोरिंगा तसेच संत्र्याच्या सालींपासून पावडर तयार करून विक्री करण्यासाठी अजिंक्य यांनी शेतातच प्रक्रिया उद्योग उभारला आहे. पाला सुकविण्यासाठी ड्रायरसह इतर आवश्यक यंत्रसामग्रीची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 10 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या युनिटमध्ये पानांचे व सालींचे वाळवण, पावडर निर्मिती, पॅकिंग आणि विक्रीची संपूर्ण प्रक्रिया केली जाते. त्यामुळे उत्पादनाला अधिक मूल्यवर्धन मिळून उत्पन्नात वाढ झाली आहे. (प्रगतशील शेतकरी अजिंक्य खेरडे यांचा संपर्क क्रमांक 9730068290)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत