Headlines

Amit Shah Kolhapur Visit: हा देश काही धर्मशाळा नव्हे! कोल्हापुरात अमित शहांनी काँग्रेस, उद्धव ठाकरेंना डिवचलं


Amit Shah Kolhapur Visit: केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरात आगमन झाले. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर पोलिस मैदानावर महायुतीची जाहीर सभा झाली.

amit shah
अमित शहा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: व्होट बँक म्हणून घुसखोरांचा वापर करून काँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे, याच काँग्रेसच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे राजकारण करतात, मी त्यांना सांगतो, हा देश काही धर्मशाळा नाही. इथे केवळ याच देशात जन्मलेले लोक राहतील. केवळ बंगालच्या सीमेवरीलच नव्हे; तर संपूर्ण देशभरातील प्रत्येक खुसखोराला शोधून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात दिला.

दरम्यान, यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटाचे नेते म्हटले जायचे, पण आता कोणताही गट नाही संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच आहे, असे सांगून अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला.

VIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलं

या वेळी शहा यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्राला पंधराशे काटी रूपये दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. सभेआधी शहा यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर परिसरातील १५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सभेला प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन; तसेच हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना नामविस्तार समारंभही शहा यांच्या उपस्थितीत पार पडला.

Maharashtra Timesगणपतीपुळ्यात 8 जण खोल पाण्याकडे ओढले गेले, किनाऱ्यावर एकच आक्रोश, छत्रपती संभाजीनगरच्या 5 तरुणांचा करुण अंत
पुण्यात पंधराशे कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला आधार देण्यासाठी इथेनॉलसह अन्य सह-उत्पादनांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात; तसेच अशा उत्पादनांच्या यंत्रसामग्री निर्मितीसाठी पुण्यात असे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे दोन प्रकल्प राबविले जाणार आहेत. या दोन्ही प्रकल्पातून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठी ताकद मिळेल, असा विश्‍वास अमित शहा यांनी इचलकरंजी येथील सभेत व्यक्त केला. जे साखर कारखाने इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), सायट्रीक अ‍ॅसिड बनवू शकत नाहीत, अशांनी एकत्रित येऊन १५०० कोटी रुपये खर्चाचा सहकारी प्रकल्प राबविला जाणार आहे, असेही शहा या वेळी म्हणाले.

जावयाची सेवा…
फडणवीस म्हणाले, अमित शहा कोल्हापुरचे जावई आहेत. पण धोंड्याचा महिना संपवून चार दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाची सेवा करण्याची पद्धत आहे उशिरा आले तरी आम्ही सेवेत कुठेही कमी पडलो नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा