Headlines

Chandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी – chandrapur wife pays rs 1 lakh to killers for ends teacher husband life 4 arrested


Chandrapur Crime: २ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता.

chandrapur crime
चंद्रपूर क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली आहे. रवींद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६) रा. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. तर पत्नी दीपमाला कुळमेथे, वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख पटवली. प्राथमिक तपासात हा आकस्मिक मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.

Maharashtra TimesNashik TCS धर्मांतर प्रकरणामागे ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’; निदा खानचा मोठा गेम उघड, तपासात काय आढळलं?
भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Maharashtra TimesPune Nasrapur Case : मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा; आरोपीची बायको म्हणते, 11 वर्ष संबंध नाही, शिक्षा करा, बॉडीही देऊ नका
कारमध्ये आवळला गळा १ मे रोजी आरोपींनी मृतकाला
१ मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. रवींद्र हा गडचिरोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. मात्र मागील दीड वर्षांपासून तो शाळेत जात नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते व त्यातच तो पत्नीला मारझोड करीत त्रास देत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे त्रस्त होऊन तिने हे पाऊल उचलण्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा