![]()
आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आणि ‘दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 22) ‘सुशिक्षित गुंतवणूकदार, विकसित भारत आणि सुरक्षित भविष्य’ या विषयावर गुंतवणूकदार जागरूकता कार्यशाळा पार पडली. गुंतवणूकदारांना वैयक्तिक वित्त नियोजनाची उत्तम समज देणे आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी त्यांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यात म्युच्युअल फंड हा भविष्यातील सर्वांत सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. साडेतीन मुहूर्तावर केलेली खरेदी गुंतवणूकच : भाऊ पाटील इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड डिस्ट्रीब्युशन डेव्हलपमेंटचे झोनल मॅनेजर अभिजित देशमाने यांनी बचत आणि गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे, कमी वयात गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे तसेच दीर्घ मुदतीसाठी चक्रवाढीचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध खर्च करून व्यक्ती आपल्या आर्थिक सुरक्षेशी तडजोड न करता चांगले जीवन जगू शकते. शॉर्ट, मीडियम आणि लाँग टर्म गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज त्र्यंबकेश्वर येथील विश्वस्त भाऊ पाटील यांनी हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी केले जाते. या गुंतवणुकीचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे. पूर्वी लोक पेढ्यांमध्ये गुंतवणूक करायचे. आता म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक निर्णयांमध्ये वित्तीय साक्षरता वाढवा कार्यक्रमादरम्यान झालेल्या पॅनेल चर्चेत शेअर बाजारतज्ज्ञ रुपेश कांदळकर, विनोद चौधरी, मुकुंद चांडक यांनी गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचार मांडले. चौधरी म्हणाले, म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर सेबीची नजर असते. वैशिष्ट्य म्हणजे १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमी वयापासून गुंतवणूक सुरू केल्यास वाढत्या वयानुसार त्याचा फायदा मिळतो. चांडक यांनी गुंतवणुकीबाबत सल्ला देताना आर्थिक निर्णयांमध्ये स्वावलंबनासाठी वित्तीय साक्षरता वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. कांदळकर यांनी मार्केट खाली-वर झाल्यास पॅनिक होऊ नका, गुंतवणूक बंद अथवा पैसे काढून घेऊ नका, असा सल्ला दिला. सूत्रसंचालन : विश्वेश सुवर्णकार
Source link
इम्पॅक्ट फिचर:म्युच्युअल फंड भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय; दिव्य मराठी आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडची संयुक्त कार्यशाळा
