Headlines

Pune virtual tour of forts experience historical sites in 360 degrees from home; शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करत येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार


म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि परिसराचा ३६० अंशांत अनुभव घेऊ शकणार आहेत. आभासी दर्शनासोबतच गड-किल्ल्यांवरील ऐतिहासिक जागेची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहितीही मिळणार आहे.

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनी आयोजित ‘स्वराज्य ३६०’ या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर राजगडाची पहिली आभासी सहल उपस्थितांनी अनुभवली. भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, प्रबोधिनीचे सचिव प्रा. महेंद्र सेठिया, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे या वेळी उपस्थित होते. अनिरुद्ध करमरकर ही संकल्पना विशद केली.

‘आपल्याकडे धार्मिक पर्यटन खूप होते. मात्र, राष्ट्रीय स्फूर्तीकेंद्र ज्याला म्हणतो, त्यांचे पर्यटन ही संकल्पना आपल्याकडे रूढ झालेली नाही. श्री शिवरायांचे सर्व गड-किल्ले हे स्फूर्तीस्थान असून, अशा ठिकाणी पर्यटन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे इतिहास भान नसलेला आपला समाज आहे,’ अशी खंत माजी खासदार रावत यांनी या वेळी व्यक्त केली.

‘सर्व गड-किल्ले पाहणे आवश्यक आहे. काही कारणांनी गड-किल्ले पाहू न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही आभासी सहल उपयुक्त ठरेल,’ असे झिरपे यांनी या वेळी सांगितले.

काय आहे प्रकल्प?

या प्रकल्पांतर्गत ‘राजगड आभासी सफर’ तयार करण्यात आली असून, यामध्ये डिजिटल दुर्गदर्शनासोबतच माहितीपूर्ण चित्रफितींचाही समावेश आहे. या उपक्रमांतर्गत सध्या मुख्यत्वे राजगड आणि इतर निवडक प्रमुख किल्ल्यांची आभासी सफर विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट इमर्सिव्ह तंत्रज्ञानाद्वारे किल्ल्यांचा इतिहास घराघरांपर्यंत पोहोचविणे हे आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत