Headlines

पोलीस बनून समाजाला प्रेरणा दिली, स्वप्न साकार करणाऱ्या संगीताचं डोंबिवलीत टोकाचं पाऊल, बारामतीकर सुन्न


डोंबिवलीत एका पोलीस महिलेने स्वत:ला संपवल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचं माहेर हे बारामती येथील आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Baramati News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : पिढ्यान्‌पिढ्या पारधी समाजावर लागलेला सामाजिक मागासलेपणाचा शिक्का पुसत शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण करणाऱ्या बारामती तालुक्यातील एका पोलीस महिलेने पतीकडून होणाऱ्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात घडली. संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१, रा. करंजे, ता. बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर त्या पती किरण भानुदास भोसले यांच्यासमवेत डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होत्या. पतीला पत्नी सावळी असल्याचे आवडत नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यातून मारहाण केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . तसेच घरातील वस्तूंच्या खरेदीवरून ‘जास्त पैसे का खर्च केले?’ या कारणावरूनही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस तक्रारीत काय म्हटलं आहे?

सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला बंद करून घेत सिलिंग फॅनला ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या आत्महत्येस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी करंजे येथील सुलोचना राजेंद्र काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्यदरम्यान, संगीताच्या सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणीसह तिचा सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात सासरच्या इतर मंडळींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाइकांनी संगीताचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. डोंबिवली पोलिसांकडून पुरवणी जबाब घेऊन इतर आरोपींविरोधातही चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संगीताच्या पार्थिवावर सोमेश्वर मंदिराजवळील शेतात विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

पारधी समाजातील मुलींसाठी ठरली होती प्रेरणास्थान

संगीताने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करत पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले होते. तिच्या यशानंतर पारधी समाजातील मुला-मुलींमध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. परिसरातील अनेक मुलींनी तिला आदर्श मानून पोलीस दलात प्रवेश केला होता.

Maharashtra TimesBandu Jadhav : ‘माणूस खास, असली शिवसेना मे आया बंडू बॉस’, एकनाथ शिंदे यांची परभणीत डायलॉगबाजीपती किरण भोसले यालाही पोलीस दलात भरती होण्यासाठी संगीताने मार्गदर्शन केले होते. त्यानंतर तोही ठाणे पोलीस दलात कार्यरत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. स्वतःच्या संघर्षातून समाजातील तरुणींसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या संगीताचा कौटुंबिक छळामुळे मृत्यू झाल्याने करंजे, सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा