Headlines

Nashik Kamatwade 16 Year Old Shravani Patil Dies after Vaccination Death Reason after Viscera Report; ‘काय व्हिडिओ काढताय, माझं सोन्यासारखं लेकरु गेलंय’; नाशकात 16 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर अंत, आईचा आक्रोश, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा


Nashik Girl Dies After Vaccination : नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नेमका मृत्यू कशामुळे झालाय? याचा उलगडा व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

Nashik Girl Dies After Vaccination
नाशिक श्रावणी पाटील लसीकरणानंतर मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लसीकरणानंतर मृत्यू झालेल्या युवतीचा व्हिसेरा दोन वेगवेगळ्या तपासण्यांसाठी ‘मेरी’ येथील फॉरेन्सिक लॅब आणि छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी दिली.

वडिलांसोबत बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्रावर

शहरातील कामटवाडे भागातील रहिवासी असलेली श्रावणी पाटील (वय १७) हिचा कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर लसीकरण केंद्रावर ‘धनुर्वात आणि घटसर्प’ लशीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर काही मिनिटांतच मृत्यू झाला. या घटनेने संबंधित युवतीच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून, दोषींवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रावणी तिच्या वडिलांसोबत बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्रावर गेली होती.
Maharashtra TimesBaramati Sports Hub : खेळाडूंची नवी पंढरी! बारामतीची मोठी ओळख, कटफळच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स हब’, ऑलिम्पिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवा; वाचा सविस्तर
लसीकरणानंतर काही मिनिटांतच, दुपारी पाउणच्या सुमारास घरी परतत असताना तिला चक्कर आली. ती रस्त्यावर कोसळून बेशुद्ध पडली. पालकांनी तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. ‘लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या विपरीत घटना’ समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आली.

व्हिसेरानंतर मृत्यूचा उलगडा

श्रावणीचा मृत्यू लसीच्या दुष्परिणामामुळे, पडल्यामुळे डोक्याला अंतर्गत दुखापत होऊन झाला की एखाद्या आजारामुळे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. जिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तपासणीसाठी तो ‘मेरी’ येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
Maharashtra TimesPune-Nashik Railway Project : कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल
‘मेरी’च्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत ‘व्हिसेरा’चे रासायनिक विश्लेषण करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात ‘हिस्टोपॅथॉचा’ अहवाल तयार होईल. तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंतिम शवविच्छेदन अहवालाद्वारे निश्चित निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. शिंपी यांनी स्पष्ट केले. उच्चस्तरीय विश्लेषणासाठी या विशिष्ट लशीच्या बॅचचे नमुने ‘सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी’कडे पाठवले जाणार आहेत, असेही डॉ. शिंपी यांनी सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा