Headlines

Nagpur Doctor Ishwarchandra Chandewar Death in Neurons Hospital after Family Dispute Crime News; दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा


Nagpur Doctor Death Case : गेल्या काही दिवसांपासून डॉ ईश्वरचंद्र तणावात होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबत असत. सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाची तीन इंजेक्शन टोचली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Nagpur Doctor Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : स्वत:ला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून घेत ४२ वर्षीय डॉक्टरने आयुष्याची अखेर केली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी नागपूरमधील धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये घडली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार (वय ४२, रा. सुयोग अपार्टमेंट, शिवशक्तीनगर, मानेवाडा) असे मृताचे नाव आहे. ते न्यूरॉन्स हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे प्रशासकीय विभागाचाही कारभार होता. त्यांनी आयुर्वेद शाखेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ईश्वरचंद्र हे तणावात होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबायचे. सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाचे तीन इंजेक्शन टोचले. यात त्यांचा मृत्यू झाला.
Maharashtra TimesCrime News : आधी बायकोशी वाद, मग 15 वर्षांपासून घरकाम करणाऱ्या महिलेचा डॉक्टरने जीव घेतला, पोलीस येताच तीनच शब्द म्हणाला

केबिनचं दार बंद करुन इंजेक्शन घेतलं

सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले. त्यांनी सकाळी काही रुग्णांची तपासणी करून नियमित कामकाज पूर्ण केले. त्यानंतर ते रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक ४०८ मध्ये गेले. दार बंद केले. मात्र सकाळी नऊ वाजून गेल्यानंतरही ते बाहेर न आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला.

Girish Mahajan यांचा फोटो व्हायरल, थेट फोटोंचे पुरावे दाखवले, म्हणाले, ‘आमचे कौटुंबिक संबंध’

कर्मचाऱ्यांनी दार तोडलं

दरम्यान, एका सहकाऱ्याने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सहकारी कॅबिनजवळ गेला. दार बंद होते. सहकाऱ्याने दार तोडले असता ईश्वरचंद्र त्याला बेशुद्ध दिसले. त्यांना लगेच हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या हाताने अॅनेस्थीसियाचे इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. इंजेक्शनची मात्रा अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra TimesPune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन , सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर

१८ वर्षांपूर्वी प्रेम विवाह, आता कौटुंबिक कलह

ईश्वरचंद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. २००८ मध्ये केरळ येथील ज्योसमी उर्फ अनु यांच्याशी डॉ. चांदेवार यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यांचा १५ वर्षांचा मुलगा दहावीत शिकत असून त्यांचा भाऊ अभियंता असल्याची माहिती आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी जीव दिल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा