Jalgaon Rohit Dhangar Died at Home on Raksha Bandhan Heartbreaking Incident; ‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’; रक्षाबंधनाच्या दिवशीच रोहित सोडून गेला, मित्राला शेवटचा व्हिडिओ पाठवला, घटनेचं कारण समोर
Jalgaon Rohit Dhangar Died at Home on Raksha Bandhan Heartbreaking Incident; ‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’; रक्षाबंधनाच्या दिवशीच रोहित सोडून गेला, मित्राला शेवटचा व्हिडिओ पाठवला, घटनेचं कारण समोर
Jalgaon Crime News : ‘हॅपी रक्षाबंधन ताई…सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको’, असा मेसेज बहिणीला शेअर करून एका 18 वर्षीय भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या आयुष्याची अखेर केलीय.
जळगाव रोहित धनगर आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : ‘हॅपी रक्षाबंधन ताई…सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको’, असा मेसेज बहिणीला शेअर करून एका 18 वर्षीय भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना जळगावमध्ये घडली आहे. तसंच, ‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’, असं स्टेटस देखील या भावाने ठेवलं होतं. धक्कादायक म्हणजे, ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याचा मित्राला व्हिडीओद्वारे निरोप दिल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील जुना आसोदा रोड परिसरात ही घटना घडली आहे. रोहित साहेबराव धनगर, असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. बहिणीकडून राखी बांधल्यानंतर घरी आल्यावर रोहितनं आत्महत्या केली. रोहित हा अकरावी कला शाखेत शिकत होता. रक्षाबंधनासाठी वडिलांसोबत रोहित आत्याच्या घरी गेला होता. तिथे त्याने बहिणीकडून राखी बांधल्यानंतर वडिलांची दुचाकी घेऊन घरी आला. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचा फोटो ठेवून, ‘सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो’, असा भावनिक मेसेज केला.
तसेच ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याचं सांगणारा व्हिडीओ मित्राला पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेसेज पाहून मित्रांनी रोहितच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने गळफास घेतला होता. कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’
दरम्यान, रोहितनं आणखी एक स्टेटस ठेवले होतं. त्यात ‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’, ‘जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी, ना दिल मे कोई ले के आऊंगा! शुक्रिया…,’ असं म्हटलं होतं. घरच्या मुलानं इतक्या टोकाचं पाऊल उचल्यामुळे धनगर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने जर घरी असं काही सांगितलं असतं तर मदत केली असती, असं म्हणत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा