Chandrapur Sindewahi Tiger Attack in Forest on 13 Woman 4 Woman Death; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना
Chandrapur Sindewahi Tiger Attack in Forest on 13 Woman 4 Woman Death; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना
Chandrapur Sindewahi Tiger Attack in Woman : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे.
सिंदेवाही वाघ हल्ला चार महिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : राज्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात एका वाघाच्या हल्ल्याने थरकाप उडाला आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर एकाचवेळी या वाघाने जीवघेणा हल्ला केला. यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. महिला तेंदूपत्ता तोडण्याचं काम करत असतानाच अचानक वाघा आला. महिलांनी वाचण्याचे प्रयत्न केले. पण, चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
सकाळची वेळ… घराजवळ शांतपणे जनावरांचा चारा कापण्याचे काम सुरू होते. अचानक दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने पांडुरंग निरगुडे यांच्या मानगुटीवर झडप घातली आणि काही क्षणांतच सोनार खोरा परिसरात एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी निरगुडे यांनी उजव्या हाताने प्रतिकार केला आणि बिबट्याला परतवून लावले. मात्र, थरार इथेच थांबला नाही. पहिल्या हल्ल्यानंतर जांभळाच्या 50 ते 60 फूट उंच झाडावर जाऊन बसलेल्या बिबट्याने तासाभराने पुन्हा खाली उतरून दुसऱ्या तरुणावर झडप घातली. ही घटना नाशिकमधील सिन्नरमध्ये उघडकीस आली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा