Headlines

US Venezuela Oil Deal; अखेर ट्रम्पनी हवं तेच केलं; इराण युद्धात दादागिरी करून 65 अब्ज बॅरल तेल हिसकावले


US-Venezuela Oil Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासोबत ‘जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार’ केल्याची घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांवर आधीपासूनच नजर होती आणि विद्यमान अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हवं तेच मिळवून दाखवलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या ऊर्जा कराराची घोषणा करताना अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त सिद्ध तेलसाठ्यांवर बहुसंख्य नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. यासह ट्रम्प ऐतिहासिक करार करण्यात यशस्वी ठरले असून इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेला मोठं यश मिळाले आहे.

Maharashtra Times8th Pay Commission Delayed: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या आनंदावर विरजण, होणार लाखो रुपयांचे नुकसान; नव्या कॅलक्युलेशनने खळबळ

व्हेनेझुएलासोबत अमेरिकेचा तेल करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या करारामुळे देशातील कच्च्या तेलाची उपलब्धता वाढेल, पुरवठ्याला चालना मिळेल आणि अखेरीस पेट्रोलच्या किमती कमी होतील. ट्रम्प यांनी या कराराला अमेरिकेच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत फायदेशीर म्हटले आणि यामुळे अमेरिकेचा तेलसाठा ‘दुप्पटहून अधिक’ वाढेल व पेट्रोलच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असा दावा केला.

32 वर्षांपर्यंत भारताची गरज पूर्ण करेल इतके तेल

65 अब्ज बॅरल तेल साठ्यातून भारताची सध्याची सुमारे 32 वर्षांची गरज पूर्ण होऊ शकते. ट्रम्प यांनी या कराराचे श्रेय परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना दिले. तसेच या करारामध्ये व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज आणि खाजगी कंपन्यांचा समावेश आहे, ज्यात अमेरिकन तेल कंपन्यांचाही समावेश असू शकतो असेही वृत्त समोर आले आहे.

Maharashtra TimesFD vs RD vs SIP: 2000 रुपयांच्या बचतीत तुम्ही पण व्हाल लखपती; FD की RD की SIP कोणता गुंतवणुकीचा पर्याय सर्वात बेस्ट; पाहा Calculationयाव्यतिरिक्त ट्रम्प म्हणाले की, या संपूर्ण करारासाठी अमेरिकी करदात्यांचा एकही पैसा खर्च होणार नाही. तसेच अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध दृढ करणारे पाऊल म्हणूनही संबोधले. मार्को रुबियो यांनीही या कराराला दोन्ही देशांतील लोकांसाठी मोठा विजय म्हटले असून या करारामुळे व्हेनेझुएलामध्ये अंदाजे 100 अब्ज डॉलर्सची खाजगी गुंतवणूक येऊ शकते, असा दावा केला.

यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यास मदत होईल, पण या खाजगी भागीदारीत सहभागी असलेल्या कंपन्यांबद्दलचा तपशील आणि कराराच्या संपूर्ण अटी अद्याप उघड केलेल्या नाहीत.

Donald Trump Venezuela Oil Deal 29 August 26

अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेलामध्ये इतका रस का?

जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर व्हेनेझुएलाचा एकाधिकार असून व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली अंदाजे 303 अब्ज बॅरल क्रूडचा साठा आहे, जे जगाच्या एकूण सुमारे 17% तेल साठ्यापैकी आहे. पण इतका प्रचंड साठा असूनही व्हेनेझुएला तेल उत्पादन जागतिक उत्पादनाच्या केवळ 1% असल्याचा सर्वात मोठा विरोधाभास आहे.

यामागे देशातील कमजोर आणि जीर्ण झालेली तेल पायाभूत सुविधा एक प्रमुख कारण मानले जाते. जमिनीखाली तेल अस्तित्वात असूनही त्यांचे स्थान सर्वज्ञात असले तरी, काढण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता फार पूर्वीपासून कमकुवत आहे. ही क्षमता पुन्हा उभारण्यात अमेरिकेला एक व्यावसायिक संधी दिसत आहे.

जगाच्या इतर भागांप्रमाणे, जिथे भूगर्भशास्त्रज्ञांना न काढलेल्या तेलाचा शोध घ्यावा लागतो, त्याउलट व्हेनेझुएलाचे भूगर्भातील साठे मोठ्या प्रमाणावर नकाशावर नोंदवलेले आणि ज्ञात आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesSubhash Chandra Loan Haircut: सुभाष चंद्रांना 22 हजार कोटींच्या कर्जमाफीविरुद्ध एचडीएफसीचा एल्गार; एनसीएलटी निकालाविरुद्ध अपील

ऊर्जा संकट अन् इंधन दरवाढीचे आव्हान

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन प्रशासनावर पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढत आहे.सहा महिन्यांपासून इराणसोबत संघर्ष सुरू असून ऊर्जा बाजारात अनिश्चितता कायम राहिली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला अमेरिकेचा सामरिक पेट्रोलियम साठा 300 कोटी बॅरलच्या खाली आला असून यापैकी 2026 च्या सुरुवातीपासून यात 100 कोटी बॅरलपेक्षा जास्त घट झाली.

अशा परिस्थितीत, ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलासोबत ट्रम्प प्रशासन करार ऊर्जा पुरवठा वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठ स्थिर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सादर करत आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत