Headlines

ज्ञानेश विद्या मंदिरात अनोखे रक्षाबंधन:झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश




उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळा व हेरंब प्राथमिक शाळेमध्ये रक्षाबंधनसणा निमित्त सर्व पाचवी ते दहावीतील प्रत्येक वर्गाच्या तुकड्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ अशा वस्तूंपासून तसेच पर्यावरणाचा विविध प्रकारचा संदेश देत दोन दोन राखी स्वतः तयार केल्या. तसेच या राखी तयार करून त्या प्रत्येक झाडाला बांधून अनोखा असा रक्षाबंधन आणि एक नवीनच विक्रम प्रस्थापित करून पर्यावरण जागृतीचा आदर्श घालून दिलेला आहे. ही संकल्पना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून, मुख्याध्यापकांकडून,आम्हा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिली गेली. इको क्लबचे शाळेतील प्रमुख ज्येष्ठ शिक्षक शेख एस एन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गातून राख्या तयार केल्या. आज पाचवी ते दहावी मधील जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय परंपरेचे रक्षण करत पारंपारिक वेशभूषेत येऊन या रक्षाबंधन सणाचा आगळावेगळा थाट निर्माण केला. दहावीच्या आणि नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर राखी तयार करून देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या गेलेल्या थीम नुसार पर्यावरणाचा संदेश देत राख्या तयार केल्या. त्यामध्ये
1) झाडाला राखी बांधूया पर्यावरणाचे रक्षण करूया, पाणी वाचवा.. पाणी अडवा..पाणी जिरवा.. सदैव निसर्गाच्या ऋणामध्ये राहूया..
2) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती..
3) झाडे आहेत तर आपण आहोत चला सर्व मिळून झाडे लावून जगवण्याचा संकल्प करूया..
4) एक तरी झाड लावूया वसुंधरेला वाचवूया..
5) झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प आज या रक्षाबंधन दिनी रुजवूया फुलवूया – फळवूया आणि आपली वसुंधरा सुजलाम सुफलाम बनवूया.. अशा प्रकारच्या घोषवाक्यांनी शाळेचा परिसर दुमदुमला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सचिव श्रीमती मीनाक्षीताई विटोरे, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, उपाध्यक्ष पुजाताई पऱ्हे, मुख्याध्यापिका जयश्री शिवपुरे, उपमुख्याध्यापक सुभाष कुंडारे, उपमुख्याध्यापक अशोक पंडुरे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक यांचा सहभाग होता. सर्वप्रथम शाळेमध्ये स्थापन केल्या गेलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तदनंतर शाळेच्या प्रवेशद्वारातील औदुंबर वृक्षाला राखी बांधून पुढील कार्यक्रमाची मुहूर्त मेढ रोवली गेली. इको क्लबचे प्रमुख एस. एन. शेख यांनी रक्षाबंधन निमित्त प्रतिज्ञा म्हणून घेतली, पर्यावरण पूरक राख्या तयार करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. डी. के. जाधव यांनी पर्यावरण पूरक राख्या शाळेच्या परिसरातील सर्व झाडांना राख्या बांधून घेतल्या. वैशाली वाघ यांनी निसर्गावर आधारित रक्षाबंधन सनानिमित्त ‘निसर्गाचे रक्षण करूया एक तरी झाड लावूया आणि ते जगवू या’ हा संकल्प सांगत कविता सादर केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राज्यगानाने झाली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत