महत्त्वाचे म्हणजे यंदाची दिवाळी चांदी खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी आणखीन खास ठरण्याची शक्यता आहे. कारण लवकरच प्रत्येक चांदीच्या दागिन्यावर HIUD Hallmark बंधनकारक होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य म्हणजे हा नियम येत्या दिवाळीत लागू होण्याची शक्यता आहे. हे नियम लागू होण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये.
देशातील विविध मोठे ज्वेलर्स आणि आयातदार यांच्या संमतीने हे नियम लागू केले जातील. नियम लागू करण्यापूर्वी इतर काही महत्वाच्या बाबीही लक्षात घेतल्या जातील. आतापर्यंत देशातील 40 मोठे ज्वेलर्स तसेच आयातदारांनी या नव्या नियमाचे समर्थन केले आहे.
HIUD म्हणजे काय?
HIUD म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन. हे विशिष्ट प्रकारचे क्रमांक असून ते हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांना देण्यात येते. एखाद्या दागिन्यावर HIUD क्रमांक असण्याचा फायदा म्हणजे ते पाहून ग्राहकाला दागिन्याच्या गुणवत्तेबद्दल खात्री पटते. आत्तापर्यंत हा क्रमांक चांदीच्या दागिन्यांसाठी ऐच्छिक होता परंतु नवा नियम जर लागू झाला तर आता प्रत्येक चांदीच्या दागिण्यावर HIUD क्रमांक असणे बंधनकारक असेल. त्यामुळे चांदी खरेदी करताना ग्राहकाला चांदीची शुद्धता तसेच ओळख याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळवता येईल.
HIUD ची नवीन प्रणाली
नव्या नियमात चांदीच्या दागिन्यांना फक्त HIUD क्रमांक अनिवार्य नसेल तर HIUD संबंधित विकसित करण्यात आलेल्या नव्या प्रणालीचाही लाभ घेता येईल. समजा ग्राहकाकडून भविष्यात HIUD क्रमांक असणारे चांदीचे दागिने हरवले किंवा चोरीला गेले अशावेळी आरोपीला ताब्यात घेणे आणखीन सोपे व जलद होऊ शकते.
HIUD च्या नवीन प्रणालीचा ग्राहकांना फायदा काय?
HIUD च्या नव्या प्रणालीत चांदीच्या दागिन्यावर सहा अंकांचा विशिष्ट क्रमांक पुरवण्यात येतो. या विशिष्ट क्रमांकाचा फायदा असा की त्याआधारे दागिन्याची संपूर्ण माहिती जाणून घेता येते. दागिन्याचे सेल रेकॉर्ड, विकल्यानंतर दागिन्याचा मागोवा तसेच दागिन्याचे वजन, फोटो आणि दागिन्याचा Sold Tag अशा प्रकारची महत्त्वाची माहिती जाणून घेता येते. या प्रणालीत सिस्टम अलर्ट पुरवण्यात आला आहे. म्हणजे जर भविष्यात दागिन्याचा कुणी गैरवापर केला तर याची थेट सूचना ग्राहकाला मिळेल.
जर एखाद्या दागिन्याचा HIUD क्रमांक आधीपासून सिस्टममध्ये नोंद असेल तर पुन्हा त्याच क्रमांकाने कोणत्याही दागिन्याची नोंद करता येणार नाही. याचा फायदा असा की फेक HIUD क्रमांक टाळता येईल तसेच होणाऱ्या फसवणुकीला आधीच आळा घालता येईल.
Explained : युद्धानंतर पाकिस्तानचा शेअर बाजारही सावरला पण भारतात अजूनही घसरण सुरूच, यामागची ४ कारणंसुरुवात होणार मोठ्या ज्वेलर्सपासून
भविष्यात जर हा नियम लागू झाला तर सुरुवातीला देशातील प्रत्येक ज्वेलर्समध्ये अचानक बदल झालेला दिसून येणार नाही. आधी देशातील मोठ्या ज्वेलर्समध्ये याची चाचणी होईल त्यानंतरच हळूहळू संपूर्ण देशभरात या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल.

