Headlines

Sugar Purchase Limit In India ; ग्राहकांच्या साखर खरेदीवर लागली लिमिट! आता 3 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही, नवीन नियम


येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत मिठाईच्या मागणीत वाढ होईल.पण देशात आधीच साखर महागली असल्यामुळे पुढे मिठाईच्या किंमतीही महागण्याची शक्यता आहे. भारतात सणासुदीच्या दिवसांत साखरेला मोठी मागणी असते.पण याच दिवसांत साखरेच्या पुरवठ्यात खोळंबा झाला तर पंचायत होते.साखर महागल्यामुळे आधीच साखरेच्या पुरवठ्यावर दबाव आहे. अशात काही क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म तसेच रिटेल स्टोअर्स यांनी देशातील जनतेला खरेदी करता येणाऱ्या साखरेवरही मर्यादा घातल्या आहेत.

साखर खरेदी करण्यावर मर्यादा म्हणजे नेमकं काय?

ग्राहकांना आता त्यांना हवी तितकी साखर खरेदी करता येणार नाही. देशात यंदा साखरेचे उत्पादन फार कमी झाल्यामुळे साखर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशात भारत सरकारने साखर वितरक तसेच साखरेचा साठा भरून ठेवणाऱ्या विविध कंपन्यांवर काही मर्यादा लावल्या आहेत.याचेच परिणाम आता देशातील ग्राहकांना भोगावे लागणार आहे. काही रिटेल स्टोअर्स तसेच विविध क्विक कॉमर्स कंपन्यांनी साखर विक्रीवर काही बंधने घातली आहेत.

आता ग्राहकांना डी-मार्ट तसेच रिलायन्स रिटेलसारख्या रिटेल शॉपमध्ये खरेदी करताना एकावेळी फक्त 3 किलोपर्यंत साखर खरेदी करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त साखर खरेदी करण्याची मुभा सध्या बंद करण्यात आली आहे.

रिटेल शॉपप्रमाणे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही साखर खरेदीविषयी बंधने घालण्यात आली आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर साखरेचे फक्त 2 ते 3 पॅक खरेदी करता येणार आहे. साखरेचे काही प्रसिद्ध ब्रॅंडस या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.तर काही ठिकाणी 5 किलोचा फक्त एकच पॅक उपलब्ध आहे. एकंदरीत, साखरेच्या पुरवठ्यात कमतरतेचे परिणाम क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.

साखर खरेदीवर मर्यादा का?

बाजारात साखर कमी असल्याने साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी, भारत सरकारने देशातील साखर वितरक कंपन्यांच्या साखर साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढत आहे अशात देशात साखरेचा क्लोजिंग स्टॉक कमी आहे त्यामुळे साखरेच्या विक्रीवर दबाव तयार झाला आहे. या काळात जर एकाच ग्राहकाने मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी केली तर साठवलेला साखरेचा स्टॉक पटकन संपण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काही रिटेल शॉप तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सने ग्राहकांच्या साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत.

Maharashtra TimesJoint Ownership Rules: सह-कर्जदाराचा मृत्यू झाला, तर EMI ची जबाबदारी कोणाची? अख्खा कर्ज माफ होतो का? कायदा, नियम समजून घ्यासाखर पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना

देशात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी 10 लाख टन कच्च्या साखरेची आयात ड्यूटी फ्री करण्यात आली आहे. तसेच डीलर्स किंवा बल्क Consumers मंडळींना फक्त 15 दिवसांपुरतीच्या साखरेची साठवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत