भाजपमध्ये जाणारे ठाकरेंचे नगरसेवक शिवसेनेत, मल्हार पाटलांवर ओमराजे भारी पडले – shiv sena ubt dharashiv 4 corporators join shiv sena inside story explained
भाजपमध्ये जाणारे ठाकरेंचे नगरसेवक शिवसेनेत, मल्हार पाटलांवर ओमराजे भारी पडले – shiv sena ubt dharashiv 4 corporators join shiv sena inside story explained
धाराशिवच्या राजकारणात मध्यरात्री असा एक राजकीय ड्रामा घडला, ज्याने भाजपची संपूर्ण फिल्डिंग एका क्षणात उधळून लावली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन थेट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले नगरसेवक ऐनवेळी कुठं गायब झाले? इंदापूरच्या महामार्गावर असा कोणता युटर्न घेतला गेला, ज्यामुळे भाजपकडे जाणारी गाडी थेट ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या दारात जाऊन थांबली? धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मल्हार पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रचलेला डाव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कसा उलथवून लावला? ‘ऑपरेशन लोटस’ला काट शह देत ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ कसे यशस्वी ठरले? त्याचीच इनसाइड स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..