Chhatrapati Sambhajinagar 22 Year Old Girl Student Missing from Hostel; शेतकरी बापाची लेक, स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर ठेवलं, 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; मैत्रिणीच्या एका जबाबामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar 22 Year Old Girl Student Missing from Hostel; शेतकरी बापाची लेक, स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर ठेवलं, 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; मैत्रिणीच्या एका जबाबामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Crime News : तरुणीने शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिचा मोबाईल कायमचा बंद झाला. बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना तिच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासा झाला.
बुलढाणा तरुणी संभाजीनगर हॉस्टेलमधून बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या 22 वर्षांच्या एका तरुणीचं आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मे 2024 पासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थिनीचा कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र, तिच्या एका मैत्रिणीने दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीमुळे या प्रकरणाच्या तपासाला अचानक वेगळं वळण मिळालं. हतबल वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात रोहित राजपूत नावाच्या संशयित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरातील एका शेतकरी कुटुंबातील तरुणी मार्च 2024 मध्ये उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली होती. ती क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना 28 मे 2024 रोजी तिचा मोबाईल अचानक बंद झाला. काळजीपोटी पालकांनी हॉस्टेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ती 25 मे रोजीच म्हणजे तीन दिवसांआधीच हॉस्टेलमधून बाहेर पडल्याचं समोर आलं. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्यानं क्रांती चौक ठाण्यात सुरुवातीला मिसिंगची नोंद करण्यात आली होती.
मुलगी बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय हवालदिल होऊन सर्वत्र शोध घेत होतं. यादरम्यान तरुणीच्या एका मैत्रिणीने पालकांशी संपर्क साधून धक्कादायक माहिती दिली. रोहित राजपूत नावाच्या तरुणानं आमिष दाखवून तिला सोबत नेल्याचं या मैत्रिणीनं सांगितलं. या घटनेनंतर रोहित राजपूत हा देखील स्वतःचं घर सोडून अचानक गायब झाला होता. त्याने तरुणीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा दाट संशय पालकांना आला.
हतबल पित्याची न्यायालयात धाव अन् हेबियस कॉर्पस
स्थानिक पोलिसांच्या तपासातून ठोस काही निष्पन्न होत नसल्यानं मुलीच्या वडिलांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेत रोहित राजपूत आणि त्याच्या नातेवाइकांना प्रतिवादी करण्यात आलं. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान रोहित किंवा त्याचे नातेवाईक हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयातील सुनावणी आणि वाढत्या दबावानंतर तरुणीच्या पालकांनी 25 ऑगस्ट रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रोहित राजपूत याच्याविरोधात तरुणीचं अपहरण करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ड्रग्जची तस्करी ही एक मोठी गंभीर समस्या आहे. या विरोधात पोलीस आणि एनसीबीकडून दररोज कठोर कारवाई केली जाते. पण तरीही चोरुन ड्रग्जची विक्री केली जाते. अशा चोरुन ड्रग्जची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. आतादेखील अशाचप्रकारची कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा