Nana Patole On MahaGenco: पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी महाजेनकोतील कोळशाची गुणवत्ता आणि कंत्राट प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कच्चा कोळसा वॉशरीमध्ये पाठविला जात असतानाही त्यामध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. काही कंपन्यांकडून पुरवठा होणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार सर्वसामान्यांकडून अधिक पैसे घेऊन राज्याची लूट करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी असल्याने त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
Tukaram Mundhe : वैध परवाना नाही, स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा, मेडिकल कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना जेवण; तुकाराम मुंढेंची धडक कारवाईस्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून, ठरावीक व्यक्तींना कंत्राटे देण्यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काळ्या यादीत टाकलेल्या व्यक्ती किंवा कंपन्यांनाही कंत्राटे देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
कायदा-सुव्यवस्थेवर टीका
नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत पटोले यांनी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या तीन महिन्यांत शहरात ३६ गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली.
Babanrao Taywade | ओबीसी नेत्यांची हक्कासाठी लढाई की नेतृत्वासाठी स्पर्धा?, तायवाडेंचं म्हणणं काय?
राहुल गांधींचा पुढील महिन्यात नागपूर दौरा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुढील महिन्यात नागपूर दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती पटोले यांनी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पटोले यांनी सरकारवर टीका केली. सरकार आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेत असून, त्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊन विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

