Rishabh Pant Update : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत तिसऱ्या दिवशी फिल्डिंगला आली नाही. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता की पंत कुठे आहे? परंतु पंत जेव्हा हाताला पट्टी बांधून बाहेर आल्यावर समजलं की तो दुखापती आहे. तो आता कसोटी सामना खेळणार आहे की नाही? याबाबत कोच मोर्केल यांनी अपडेट दिली आहे.
Rishabh pant Injury Update(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी मैदानावर ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत होता. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला की ऋषभ पंत कुठे गेला? कारण पंत हा विकेटकीपर म्हणून असताना जुरेलकडे कशामुळे ही जबाबदारी सोपवण्यात आली. सामना सुरू असताना पंत बाहेर आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण पंतच्या खांद्याला दुखापत झाली आहे. आता पंत कसोटी सामन्यातून बाहेर गेलाय की खेळणार याबाबत कोच भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी माहिती दिली आहे.
मॉर्ने मॉर्केल काय म्हणाले?
‘ऋषभ पंतचा खांदा खूपच दुखावला आहे. तिथे सूज आली आहे. त्याची मंगळवारी रात्री तपासणी होईल. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूची संघाला गरज आहे. चौथ्या दिवशी तो मैदानात दिसेल अशी आशा करूयात,’ असे माहिती मॉर्ने मॉर्केल यांनी दिली. मात्र, सोशल मीडियावरील पंतचा जखमी अवस्थेतील फोटो पाहून तो श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना खांद्याला चेंडू लागल्यामुळे पंत हाताला पट्टी बांधून ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दिसला. पंतने तिसऱ्या दिवशी पूर्ण वेळ यष्टीरक्षण केले नाही. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची धुरा सांभाळली. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मॉर्केल म्हणाले, ‘आम्ही रात्रभर त्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून असू आणि उद्या तो यष्टींमागे दिसेल अशी आशा आहे. पंत जखमी होऊन निवृत्त झाल्यावर पुन्हा मैदानात आला होता. त्याने ८९ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह ६३ धावांची खेळी केली.
IPL 2027 : फ्लेमिंगनंतर CSKचा हेड कोच कोण? मॅथ्यू हेडनने थेट नाव सांगून टाकलं; म्हणाला, चेन्नई टच चेहरा हवा!दुसऱ्या कसोटीपूर्वी कुलदीप यादवला ताप आला होता. त्यामुळे त्याची निवड झाली नसल्याचे मॉर्केल यांनी सांगितले. मंगळवारी सोनल दिनुशा, केशर नुर्वात आणि लाहिरू कुमार यांनी श्रीलंकेकडून काही कडवी झुंज दिली. याबाबत स्पष्टीकरण देताना मॉर्केल म्हणाले, ‘लवकरात लवकर फलंदाजांना बाद करून मैदानातून बाहेर पडणे हीच नेहमीची योजना असते; पण हा खेळाचा भाग आहे. कूकाबुरा चेडू कधीकधी मऊ पडतो आणि त्यामुळे खेळपट्टीवरून गती मिळवणे कठीण होते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि एक छान भागीदारी रचली. आमच्या गोलंदाजीत काही दोष आहेत असे मला वाटत नाही. क्रिकेटमध्ये असे घडू शकते.’
पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याबद्दल श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याला ताकीद देण्यात आली. दुसऱ्या दिवशी तो नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला होता. त्याने अपुऱ्या प्रकाशाकडे लक्ष वेधले होते. पंचांनी खेळ सुरू ठेवण्याची सूचना केली. त्यात तो बाद झाला. त्यानंतर त्याने पंचांकडे बघत ग्लोच्ज फेकून दिले होते; तसेच त्याने बॅटही आपटली होती. त्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा