Headlines

अरे हे काय! टीम इंडियाचा ‘धुरंधर’ ऋषभ पंत कसोटीतून पडणार बाहेर? कोच मॉर्ने मॉर्केलकडून महत्त्वाची अपडेट


Rishabh Pant Update : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत तिसऱ्या दिवशी फिल्डिंगला आली नाही. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता की पंत कुठे आहे? परंतु पंत जेव्हा हाताला पट्टी बांधून बाहेर आल्यावर समजलं की तो दुखापती आहे. तो आता कसोटी सामना खेळणार आहे की नाही? याबाबत कोच मोर्केल यांनी अपडेट दिली आहे.

Rishabh pant Injury Update
Rishabh pant Injury Update(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी मैदानावर ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत होता. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला की ऋषभ पंत कुठे गेला? कारण पंत हा विकेटकीपर म्हणून असताना जुरेलकडे कशामुळे ही जबाबदारी सोपवण्यात आली. सामना सुरू असताना पंत बाहेर आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण पंतच्या खांद्याला दुखापत झाली आहे. आता पंत कसोटी सामन्यातून बाहेर गेलाय की खेळणार याबाबत कोच भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी माहिती दिली आहे.

मॉर्ने मॉर्केल काय म्हणाले?

ऋषभ पंतचा खांदा खूपच दुखावला आहे. तिथे सूज आली आहे. त्याची मंगळवारी रात्री तपासणी होईल. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूची संघाला गरज आहे. चौथ्या दिवशी तो मैदानात दिसेल अशी आशा करूयात,’ असे माहिती मॉर्ने मॉर्केल यांनी दिली. मात्र, सोशल मीडियावरील पंतचा जखमी अवस्थेतील फोटो पाहून तो श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra TimesIND vs SL News : सर्वाधिक ट्रोल झाला, टीममधील जागेवरही प्रश्नचिन्ह होतं; आता श्रीलंकेत चमकला, कोचनं ‘वर्ल्ड क्लास’ बॉलरची पदवी दिली

चेंडू लागल्यामुळे दुखापत

दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना खांद्याला चेंडू लागल्यामुळे पंत हाताला पट्टी बांधून ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दिसला. पंतने तिसऱ्या दिवशी पूर्ण वेळ यष्टीरक्षण केले नाही. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची धुरा सांभाळली. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मॉर्केल म्हणाले, ‘आम्ही रात्रभर त्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून असू आणि उद्या तो यष्टींमागे दिसेल अशी आशा आहे. पंत जखमी होऊन निवृत्त झाल्यावर पुन्हा मैदानात आला होता. त्याने ८९ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह ६३ धावांची खेळी केली.

Maharashtra TimesIPL 2027 : फ्लेमिंगनंतर CSKचा हेड कोच कोण? मॅथ्यू हेडनने थेट नाव सांगून टाकलं; म्हणाला, चेन्नई टच चेहरा हवा!दुसऱ्या कसोटीपूर्वी कुलदीप यादवला ताप आला होता. त्यामुळे त्याची निवड झाली नसल्याचे मॉर्केल यांनी सांगितले. मंगळवारी सोनल दिनुशा, केशर नुर्वात आणि लाहिरू कुमार यांनी श्रीलंकेकडून काही कडवी झुंज दिली. याबाबत स्पष्टीकरण देताना मॉर्केल म्हणाले, ‘लवकरात लवकर फलंदाजांना बाद करून मैदानातून बाहेर पडणे हीच नेहमीची योजना असते; पण हा खेळाचा भाग आहे. कूकाबुरा चेडू कधीकधी मऊ पडतो आणि त्यामुळे खेळपट्टीवरून गती मिळवणे कठीण होते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि एक छान भागीदारी रचली. आमच्या गोलंदाजीत काही दोष आहेत असे मला वाटत नाही. क्रिकेटमध्ये असे घडू शकते.’

Maharashtra TimesIND vs SL : भारत पाचशे पार गेला, श्रीलंकेच्या 8 विकेट्सही घेतल्या; पण तिसऱ्या दिवशी दोन फलंदाजांनी सामना रंगतदार केला, नेमके कोण?

प्रभात जयसूर्याला ताकीद

पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याबद्दल श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याला ताकीद देण्यात आली. दुसऱ्या दिवशी तो नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला होता. त्याने अपुऱ्या प्रकाशाकडे लक्ष वेधले होते. पंचांनी खेळ सुरू ठेवण्याची सूचना केली. त्यात तो बाद झाला. त्यानंतर त्याने पंचांकडे बघत ग्लोच्ज फेकून दिले होते; तसेच त्याने बॅटही आपटली होती. त्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली.