Manav Suthar Icc Test Ranking : भारताचा उगवता तारा मानव सुतार याने कसोटी रँकिंगमध्ये ंमोठी झेप घेतली आहे. भारताने कसोटी जिंकल्यावरही सगळ्या गोलंदाजांची क्रमवारीत घसरण झाली. पण पठ्ठ्या वन साईड किंग ठरत दिग्गजांना मागे टाकलेय. कितव्या स्थानी पोहोचला जाणून घ्या.
ICC Test Ranking Manav Suthar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसीची रँकिंग बुधवारी जाहीर झाली. यामध्ये भारताचा स्टार खेळाडू कसोटी क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाज असलेल्या जसप्रित बुमराह याने पहिले स्थान गमवले गेले. ऑस्ट्रेलियाचा स्ट्राईक बॉलर मिचेल स्टार्क याने पहिल्या स्थानी झेप घेतलीय. करियरमध्ये स्टार्कने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन स्थान मिळवले आहे. बांगलादेशविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यात स्टार्कने १२ विकेट घेतल्याने त्याला फायदा झाला. तिसऱ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानी झेप घेतलीय. गेले ६९७ दिवस नंबर वन राहिलेला बुमराह आता दुसऱ्या स्थानी गेलाय. आता सुरु असलेल्या भारत-श्रीलंका कसोटी मालिका खेळत असलेल्या गोलंदाजांचीही क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. मात्र भारतासाठी तिसरा सामना खेळणारा युवा खेळाडू मानव सुतार याने मोठी मुसंडी घेतलीय.
कसोटी रँकिंगमध्ये गोलंदाज मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या सर्वांनाच फटका बसलाय. भारत कसोटी मालिका जिंकूनही गोलंदाजांची क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. मोहम्मद सिराज १४ वरून १८व्या स्थानी, जडेजा १६वरून १९ व्या स्थानी, कुलदीप यादव तर १४ वरून थेट २६ व्या स्थानी फेकला गेला आहे. १२ स्थानांनी त्याची घसरण झाली आहे. मात्र मानव सुतारला याचा फायदा झाला असून पठ्ठ्याने ७६ व्या स्थानावरून ४८ व्या स्थानी आलाय. मानवने २८ स्थानांची प्रगती केली आहे.
Imran Khan : ‘इम्रान खान यांना एका डोळ्याने कमी दिसतं, खिडकी नसलेली कोठडी’; मुलाचे खळबळजनक दावे, काय म्हणाला? मानव सुतार याने दोन कसोटी सामने खेळले असून आता असलेला भारत श्रीलंकेमधील सामना त्याचा करियरमधील तिसरा सामना आहे. मानव सुतार याने दोन सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यात मानवने ७ विकेट, भारत-श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात १० विकेट नावावर केल्या आहेत. आता सुरू असलेल्या सामन्यातही त्याने पाच विकेट घेतल्या असून अजून कसोटी सामना बाकी आहे.
Sanjay Manjrekar : वैभव आणि जयस्वालला आताच आवरा, संजय मांजरेकरांची जाहीरपणे दोघांवर कारवाई करण्याची मागणी, काय कारण? दरम्यान, मानव सुतारचा क्रिकेटमधील प्रवास राजस्थानपासून सुरू झाला. २०२२मध्ये त्याने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतरच्या रणजी हंगामात आपल्या फिरकीची ताकद दाखवत अवघ्या ६ सामन्यांत ३९ विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीमुळे त्याची निवड इंडिया ए संघात झाली. पुढे गुजरात टायटन्सने त्याला आयपीएलमध्ये संधी दिली आणि २०२४मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर ६ जून २०२६रोजी टीम इंडियापर्यंत पोहोचला, जेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि भारताचा ३१९वा टेस्ट क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा