Radhika Deshpande Post : मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनं क्रिती सेननच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला असून चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

राधिका देशपांडेची पोस्ट
मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘डियर क्रीपी, येत्या २८ तारखेला ‘रक्षा बंधन’ आहे, ह्याची तू अनेकांना आठवण करून दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. मात्र, हा दिवस तुला बरीच वर्षे लक्षात राहणार ह्याची सोय करून ठेवलीस, अभिनंदन. तुझी इन्स्टा स्टोरी वाचली म्हणून रक्षा बंधन हा सण का साजरा केला जातो, ह्याची आख्यायिका अनेकांनी वाचली, त्याबद्दल ही तुझे धन्यवाद. बरंच झालं. आतापर्यंत राहुल ‘भाऊ’मुळे अनेक लोक विषयाच्या खोलात शिरत होते. आता त्यांच्या ‘बहिणी’ही ते करण्याची संधी देत आहेत, हे चांगलंच आहे. म्हणजे भावा-बहिणींनी मिळून कितीही मंदिरं पाडली, तरी सनातन संस्कृती काय मरत नाही, हे परत सिद्ध होणार. कारण, राखी पौर्णिमेचा दिवस तुझ्यासारखा साजरा कोणी करत नाही गं…(अपवाद वगळता).’
Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स
‘आता थोडं तुझ्या कृतीबद्दल बोलूया हं…तर तुझ्या इन्स्टा स्टोरी प्रमाणे
१. सणाचं महत्त्व त्या दिवशी घातलेल्या कपड्यांवरून नाही, तर हृदयात असलेल्या भावना आणि परंपरेवर आधारित असतं. अगदी बरोबर! म्हणूनच तर करकचून बांधलेली कंचुकी तू घातलीस. समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं. इथे मी भाऊ म्हणणार नाही, कारण जाहिरातीत तू त्याला कुठेही भैय्या किंवा ब्रो म्हटलं नाहीस.
२. तू तुझ्या बहिणीला राखी बांधतेस, कुत्र्याला आधी बांधतेस. त्यामुळे २.० मध्ये आई-वडिलांना आणि नवऱ्यालाही बांधताना आम्हाला दिसलीस, तर आम्ही तुला समजून घेऊ. तसंच, गेली शंभर वर्षं भावाला राखी बांधायची, निर्जीव वस्तूंना, जसं की सायकल, कार, ह्यांना राखी बांधत आलो आहोतच. पण जे चाललं आहे ते चालू द्यायचं तर ते नाही, आता ते बोर झालं. काहीतरी करून भेसळ करायलाच हवी. विकृती आणून new normal करायलाच हवं. हो की नाही?’
Chinmayee Sumeet : ‘मराठी डाऊनमार्केट भाषा, असं जिममध्ये सांगितलेलं’, चिन्मयी सुमीत यांनी सांगितला अनुभव, मराठी भाषा सक्तीवर काय म्हणाल्या?
‘३. आणि कपड्यांबद्दल म्हणशील, तर पुरुष मंडळींचं ऐकायचं नसतं. त्यांची सांगण्याची पद्धत चुकते बहुतांश वेळा आणि तीच महत्त्वाची. त्यांच्या भावना थोडीच महत्त्वाच्या असतात! तो अधिकार आपण सर्वांनीच गमावला. आधुनिक आणि प्रगतिशील होण्याच्या ओघात भारतीयांनी चांगलं ते स्वीकारता स्वीकारता वाईटही आत्मसात केलं आणि तुमच्यासारखे गुळगुळीत आणि मुळमुळीत ‘भाऊ-बहिण’ इतरांच्या मेंदूचा सर्गोटा करण्याच्या मागे आहेतच, अजेंड्यामार्फत.
४. स्वास्थ्य, सुख आणि आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतोच. मग ‘मेरा गिफ्ट?’ कशाला ते? हा.. जाहिरातीत मागावं लागणार. नाहीतर GIVAचा संस्कृती आणि परंपरा जपत खप कसा वाढेल, नाही का? आणि हा कुठला जीवा? ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ एवढंच मला माहिती आहे. उद्या म्हणाल, हाच तो जिवा. उद्या तुम्ही काहीही म्हणाल, म्हणून आम्ही एक वेळ ऐकून घेऊ, पण काहीही कराल, म्हणून खपवून घेणार नाही. “No Bindi No Business.” Please maintain the protocol. आणि हो, क्षमा कर क्रीती, तुला मी सुरुवातीला क्रीपी म्हणून संबोधलं. पण मला खात्री आहे, तू समजून घेशील, कारण शेवटी भावना महत्त्वाच्या. संस्कृती, परंपरा हे निव्वळ पाळीव शब्द. सणासुदीला भुंकणारे.’ असं राधिकानं शेवटी म्हटलं आहे.

