Nepal Flash Flood update: १०० हुन अधिक भारतीय नागरिक नेपाळच्या पुरानंतर बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यात कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा समावेश आहे. एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये काही नेपाळी नागरिक असल्याचे समोर आले आहे. दुपारपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य सुरु आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.

एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता
नेपाळ पर्यटक बोर्डच्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता आहे. त्याहून २९१ विदेशी नागरिक तर ९३ नेपाळी नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. बेपत्ता विदेशी नागरिकांपैकी १०५ नागरिक हे भारतातील असल्याचे समोर आले आहे. तर ३७ जण हे भारतीय वंशाचे एनआरआय आहे. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिक बेपत्ता आहेत. तर काहींची ओळख अजून समजू शकली नाही ते कुठल्या देशाचे रहिवासी आहे. पर्यटन मंडळाने ही यादी प्राथमिक स्थरातील आल्याचे सांगितले आहे.
बेपत्तांमध्ये कैलास मानसरोवरचे यात्रेकरूंचा समावेश
मोठ्या प्रमाणात संपर्क तुटलेले लोक हे कैलास मानसरोवरचे तीर्थयात्री असल्याचे समोर आले आहे. काठमांडू येथील ‘टच कैलास ट्रॅव्हल्स आणि टूर्स’ चे व्यवस्थापकीय संचालक बशू कुमार यांनी सांगितले की ९३ नेपाळी नागरिकांसह एकूण ३९० तीर्थ यात्रेकरू हे आज बुधवारी सीमा ओलांडणार होते.यात्रेकरूंशी संपर्क साधण्याचे आणि त्यांची स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती ट्रेकिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ नेपाळ’चे अध्यक्ष सागर पांडे यांनी दिली.
बचाव कार्य सुरु
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर २५ हुन अधिक जणांचा बचाव करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुवाकोटमधील बिदुर नगरपालिकेच्या त्रिशूळ नदी जवळ चार मृतदेह सापडले. बचाव कार्य आणि शोधासाठी नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिस तैनात काण्यात आले आहे. १४ हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी तर बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचीही मदत घेण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी त्रिशूळ येथील ‘मिलिटरी ट्रेनिंग सेंटर क्र. १’ मध्ये एक उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. महापुराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून हवामान विभाग आणि हाइड्रोलॉजीच्या तज्ञ महापुर कश्यामुळे आला याचा शोध घेत आहे.
भारतीयांना अमेरिकेत नोकरी करणं आणखी महाग, आता एका जॉबसाठी कंपन्यांनाच 1,03,265 डॉलर मोजावे लागतील
भारतातील सीमावर्ती भागाला सतर्क राहण्याचा इशारा
भारतीय सीमेपासून नेपाळमधील त्रिशूळ नदी १६० किमी अंतरावर आहे. त्रिशूळ नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. हीच नदी पुढे नारायणी नदीला जाऊन मिळते. भारतात प्रवेश केल्यानंतर याच नदीला गंडक म्हणून ओळखलं जात. त्यामुळे भारत सरकारने बिहार आणि उत्तरप्रदेशातील प्रशासनाकला सतर्क राहण्याचा इशारा सूचना जाहीर करत दिला आहे. एवढेच नाही तर आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देखील प्रशासनाला सूचनेतून देण्यात आला आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी अमित शहांनी केली चर्चा
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी कॉल वर चर्चा केली. या चर्तेत नेपाळमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे बिहारमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या पूर्वपरिस्थितीची आणि याचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले. NDRFच्या दलाल आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी X वर केली पोस्ट
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळमध्ये आलेल्या पुरस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. नेपाळच्या रसुवा भागातील भोटे कोष्टी नदीला पूर आल्याने मोठे नुस्कान झाले. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. भगवान पशुपतिनाथ यांच्या चरणी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. गंडक आणि नारायणी नदीच्या पात्रात वाढ होत असल्याने उत्तरप्रदेशातील महाराजगंज व कुशीनगर जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. असे योगी आदित्यनाथ यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

