Headlines

Nagpur Wathoda Congress Corporator Shubham Mothghare House Firing by Unknown Persons CCTV Footage; भरधाव बाईकने आले, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, काचा फुटल्या, कुटुंबीय घाबरले; थरारक CCTV फुटेज


Nagpur Congress Corporator Shubham Motghare House Firing : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Nagpur Congress Corporator Shubham Motghare House Firing
नगरसेवक शुभम मोटघरे घरावर गोळीबार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्यानं नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. वाठोडा परिसरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, गोळीबार झाला त्यावेळी मोटघरे आणि त्यांचे कुटुंबीय घरातच उपस्थित होते. सुदैवाने या थरारक घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गोळ्या लागल्यानं घराच्या काचा फुटल्या असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती मोटघरे यांच्या घराजवळ आले. काही वेळ परिसरात थांबल्यानंतर त्यांनी अचानक घराच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे मोटघरे यांच्या कुटुंब आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Maharashtra TimesTukaram Mundhe: सचिन तेंडुलकरच्या भावापेक्षा माझा भाऊ खूपच मोठा; तुकाराम मुंढेंचे बंधूप्रेम, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

गोळीबारात घराच्या काचा फुटल्या

गोळीबार झाला त्यावेळीशुभम मोटघरेआणि त्यांचे कुटुंबीय घरातच होते. हल्लेखोरांनी घराच्या दिशेने केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या आहे. सुदैवाने गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबारासाठी कोणत्या प्रकारच्या शस्त्राचा वापर करण्यात आला? किती गोळ्या झाडण्यात आल्या? आणि हल्लेखोर नेमके कोण होते? याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेतील दोन संशयित हल्लेखोर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे दोन्ही हल्लेखोर शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने येताना तसेच गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाताना फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलिसांच्या विविध पथकांना आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, हल्लेखोर कोणत्या दिशेने आले आणि गोळीबारानंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra TimesPune Crime : दारु पिताना भांडण, महिलेचा हात पिरगळला, हात पिरगळल्याने संतापून महिलेने मित्रालाच संपवलं; पुण्यात नेमकं काय घडलं?

हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

काँग्रेस नगरसेवकाच्या घराला लक्ष्य करून गोळीबार झाल्यानं या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला आहे का? पूर्वीच्या कोणत्या वादातून करण्यात आला आहे का? किंवा यामागे अन्य काही कारण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर वाठोडा परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा