Headlines

Tanushree Dutta : ‘सेटवरच्या काही लोकांनी मला एकटं पाडलं, बळीचा बकरा बनवलं’, तनुश्री दत्ताचा बॉलिवूडवर निशाणा; सांगितला कटू अनुभव


Tanushree Dutta On Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बॉलिवूडवर निशाणा साधला असून इंडस्ट्रीतील कटू अनुभव शेअर केला आहे.

Tanushree Dutta On Bollywood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. अभिनेत्रीच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. आता, तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, अभिनेत्रीनं इंडस्ट्रीतील दिग्गजांवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूडमध्ये, दिग्गज अभिनेते म्हणजे राक्षस आहेत’, असं तनुश्रीनं म्हटलंय. केवळ वयस्कर असल्यामुळे कोणाचा आदर का करावा, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.

तनुश्री दत्ताची पोस्ट

बॉलिवूडवर निशाणा साधत तनुश्री दत्ता म्हणाली, ‘पनवती म्हणजे अपशकुन किंवा दुर्दैव आणणारी व्यक्ती. काही लोक जिथे जातात तिथे आपल्यासोबत अपशकुन किंवा दुर्दैव घेऊन येतात. वाईट लोकांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्या संगतीनं त्यांना पाठिंबा किंवा प्रोत्साहन देता कामा नये. राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तिक संगतीची जबाबदारी घेतली पाहिजे. महादेवानं मला याबद्दल एक स्वप्न दाखवलं! जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांशी किंवा गोष्टींशी संबंध ठेवता, तेव्हा चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत. हाच अपशकुन आणि दुर्दैव आहे जे वाईट संगतीमुळे होतं.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

तनुश्रीनं पुढे लिहिलं की, ‘मी त्यावेळी मोठी स्टार होते. कदाचित पहिल्या नंबरवर किंवा अगदीच सुपरस्टार नव्हते, पण एक स्टार अभिनेत्री नक्कीच होते. पण मी जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा लक्षात येतं की, काही परिस्थितीचा मला फटका बसला. जेव्हा मी नवीन होते तेव्हा ही इंडस्ट्री नेमकी कशी चालते, हे मी पूर्णपणे समजून घेतलं नव्हतं. त्यामुळे सेटवरच्या काही लोकांनी मला एकटं पाडलं. मला बळीचा बकरा बनवलं. त्यावेळी मी व्यवहारी नव्हते. त्यामुळे मला फटका बसला. पण, बॉलिवूडमध्ये कोणी वयानुसार सीनियर नसतं. ज्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालतो आणि हिट ठरतो, तोच खरा स्टार असतो.’

‘एखादा अभिनेता वयानं मोठा आहे किंवा ज्येष्ठ आहे म्हणून त्याला कोणी काम देत नसेल. त्यामुळे आपण त्याला मदत करावी, असं मलाही वाटायचं. पण नाही, बॉलिवूडमध्ये ‘दिग्गज कलाकार’ म्हणजे धूर्त बुद्धीचा, ज्यानं अनेक अनुभव घेतले आहेत आणि त्याला सगळ्या प्रकारची कटकारस्थानं माहिती आहेत. अशा व्यक्ती, ज्याला मीडिया आणि प्रेक्षकांना सहज मॅनिप्युलेट करता येतं, तो खरा ज्येष्ठ अभिनेता असतो.

Maharashtra TimesMohan Joshi : डोळ्यापुढे अंधारी, मेंदूत रक्ताची गाठ आढळली; मोहन जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, पत्नीनं सांगितला प्रसंग
‘आत्मा आणि दैवत्व ओळखा. राक्षसही अनुभवी असतात. राक्षस प्राचीन प्राणी आहेत आणि माणसांपेक्षाही जुने आहेत. त्यामुळे ते अनुभवी दुष्ट आहेत. म्हणजेच ते बऱ्याच काळापासून दुष्टपणा करत आले आहेत. काही माणसं ही राक्षस आणि दानवांची रूपं असून त्यांना दिशाभूल करण्यासाठी पाठवलं गेलंय. मी एक मोठा धडा शिकले. आज मी वय पाहून नाही, तर चारित्र्यानुसार एखाद्या व्यक्तीला मान देते आणि त्याचा आदर करते.’ असं तनुश्रीनं शेवटी म्हटलं.