30 year age limit for government tribal hostels canceled after rahul gandhi letter to cm devendra fadnavis for tribal students demands; राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, आदिवासी मंत्री-आमदारांची तातडीची बैठक; विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मोठा निर्णय
30 year age limit for government tribal hostels canceled after rahul gandhi letter to cm devendra fadnavis for tribal students demands; राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, आदिवासी मंत्री-आमदारांची तातडीची बैठक; विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मोठा निर्णय
मुंबई: राज्य सरकारने शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचं मागील १३ दिवसांपासून पुण्यातील मांजरी फार्म इथं उपोषण सुरू आहे. यातील एका विद्यार्थिनीने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कार्यक्रमात आपली भूमिका मांडल्यानंतर नुकतंच राहुल गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यानंतर आज राज्यातील आदिवासी समाजातील आमदार-खासदारांची मुंबई येथे महत्त्वाची बैठक पार पडली असून शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी ठेवण्यात आलेल्या ३० वर्ष वयाची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने उपोषण मागे घेतलं जाणार का, याबाबतचा संभ्रम कायम आहे.
बैठकीनंतर माहिती देताना मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं की, “१४ ऑगस्ट २०२६ शासन निर्णयाद्वारे शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र ही अट आपण आता रद्द करत असून वसतिगृहात प्रवेशासाठी अशी कोणतीही अट असणार नाही,” अशी माहिती मंत्री उईके यांनी दिली. तसंच आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणावरूनही उईके यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. सदर आश्रमशाळा ही काँग्रेसच्याच एका नेत्याची आहे, ही माहिती राहुल गांधींना देण्यात आली नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नेमक्या काय आहेत विद्यार्थ्यांच्य मागण्या?
शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींबाबतचा २०२१चा शासन निर्णय लागू करावा, या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मांजरी फार्म येथे १३ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. ऑगस्ट २०२६मधील शासन निर्णय रद्द करून ११ नोव्हेंबर २०२१चा शासन निर्णय लागू करावा, शहराच्या मध्यवर्ती भागात शासकीय वसतिगृहे सुरू करावीत, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करावे, रखडलेली आरक्षित पदभरती तातडीने करावी, बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, डीबीटी योजना रद्द करून वसतिगृहातच भोजन व्यवस्था करावी, सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी; तसेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
‘महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांच्या मागणीसाठी दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण करीत आहेत. दुर्गम गावे आणि शहरांतून आलेले हे विद्यार्थी खैरात मागत नसून, आपल्या हक्कांच्या गोष्टींची मागणी करीत आहेत. आपण त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा आहे,’ असं राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे; तसेच याबाबतचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राहुल गांधींनी दखल घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा