Iran Supreme Leader: इराणचे नवे सुप्रीम लीडर मुज्तबा खामेनी सार्वजनिक दिसत नसल्याने त्यांच्या मृत्यूच्या शक्यता वर्तविल्या जात होत्या. हाच दावा खोडून काढण्यासाठी इराणने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ते धर्मगुरू आणि शिक्षकांशी संवाद साधतांना कथितरित्या दिसत आहे. मात्र अनेकांनी या व्हिडिओच्या सत्येबाबत शंका उपस्थित केली आहे.

व्हिडिओत काय?
मुज्तबा खामेनी हे काही लोकांसोबत बसलेले आहेत. ते उपस्थिथांसोबत संवाद साधतांना दिसत आहे. सवांद सुरु करण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली. व्हिडिओमध्ये हा धर्मगुरूंसोबत धार्मिक आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा करतांना दिसत आहे. हा मुज्तबा खामेनी यांचा ऑगस्ट महिन्यात आलेला दुसरा व्हिडीओ आहे ज्यात त्यांचा स्पष्ट आवाज येत आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कुठला आहे अद्याप स्पष्ट झालेला नाही आहे. हा व्हिडीओ सर्वात आधी मेहर या सेमी ऑफिसिअल ईराणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला. या वृत्तसंस्थेला सरकार स्पॉन्सर करत असून ‘इस्लामिक डेव्हलोपमेंट ऑर्गनायझेशन’ चालवते. हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा अल अरेबियाच्या वृत्तानुसार इराणच्या फार्स न्युजने केला आहे.
हा व्हिडीओ अश्यावेळेवर समोर आला जेव्हा अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार दावा करत होते की ज्या हल्ल्यात मुज्तबा खामेनी यांचे वडील मारले गेले होते त्याच हल्ल्यात मुज्तबा खामेनी देखील गंभीर रित्या जखमी झाले आहेत. इराण नेहमी म्हणत होता की मुज्तबा खामेनी जिवंत आहे. मात्र ते जर जिवंत आहेत तर पुरावा द्या असे अमेरिका त्यांना म्हणत आला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्वात अधिक काळ सुप्रीम लीडर म्हणून कार्य केलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनी यांना नवे सुप्रीम लीडर नियुक्त करण्यात आले.
वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुज्तबा खामेनी उपस्थित नव्हते
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात पूर्व सुप्रिम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराला मुज्तबा खामेनी यांचे दोन्ही भाऊ उपस्थित होते. मात्र मुज्तबा खामेनी हे अंत्यसंस्काराला उपस्थित नसल्याने जगभरात त्यांच्या मृत्यूची चर्चा सुरु झाली होती. एवढेच नाही तर ते लोकांसमोर अंत्यसंकरानंतर देखील आलेच नाही. त्यामुळे आणि हवाई हल्ला भीषण असल्याने लोकांनी त्यांच्या प्रकृतीवर तर्क वितर्क लावायला सुरुवात केली.
इस्रायलच्या काही माध्यमांनी इराणचे सुप्रीम लीडर मुज्तबा खामेनी अत्यवस्थ आहेत असे वृत्त दिले होते. चॅनेल १४, इराणवायर आणि जेरुसलम पोस्ट यांनीही अशा प्रकारचे वृत्त चालवले होते. तर पझेश्कियन यांच्या दाव्याने इराणसह जगभरात खळबळ उडाली होती. आपण सुप्रीम लीडर मुज्तबा यांच्याशी एका अंधाऱ्या खोलीत भेटलो. त्यात ते बोलत होते परंतु, आवाज त्यांचाच होता याची खात्री पटली नाही असे इराणचे राष्ट्राध्यक्ष पझेश्कियन म्हणाले होते. नंतर इराणने पझेश्कियन यांचा दावा फेटाळून लावला होता.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी फेटाळले दावे
इराणच्या ISNA या वृत्तसंस्थेनुसार राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले की मुज्तबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चांगली आहे आणि त्यांच्या प्रकृतीला घेऊन जे तर्क वितर्क लावण्यात आले त्यांनी ते फेटाळून लावले आहेत. एखादा व्यक्ती ७ ते ८ तास चर्चा करण्यासाठी बसतो तो व्यक्ती कसा काय आजारी असू शकतो. मसूद पेझेश्कियान पुढे म्हणाले, त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुज्तबा खामेनी यांच्यासोबत ‘अत्यंत चांगली’ बैठक पार पडली.

