Guinea Capital Conakry Heavy Rain Garbage Mountain Collapsed on Shanties 22 People Dead; मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना, कचऱ्याचा डोंगर झोपड्यांवरच कोसळला; भल्यापहाटे 22 जणांचा जागीच करुण अंत
Guinea Capital Conakry Heavy Rain Garbage Mountain Collapsed on Shanties 22 People Dead; मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना, कचऱ्याचा डोंगर झोपड्यांवरच कोसळला; भल्यापहाटे 22 जणांचा जागीच करुण अंत
Conakry Landslide Incident : गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये मोठी दुर्घटना घटना घडली आहे. झोपड्यांवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं ही भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप समोर आली आहे.
गिनी कचऱ्याचा डोंगर कोसळला २२ जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोनाक्री : गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये एक भीषण मोठी दुर्घटना घटना घडली आहे. झोपड्यांवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दार एस सलाम इथे ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच दिलेल्या
गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार यादुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोनाक्रीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झालं आहे. ज्यामुळे कचऱ्याचा डोंगर ओसंडून वाहू लागला आणि कचऱ्याच्या डोंगराच्या आजूबाजूच्या झोपड्या गाडल्या गेल्या. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या डोंगराजवळ राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी आपली घरे सोडून इतरत्र पलायन केलं होतं. मात्र, काही लोक अद्यापही तिथेच राहत होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पावसाचं पाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गेल्यानं हे भूस्खलन झालं. या भूस्खलनामुळे जवळच्या झोपड्या ढिगारा आणि चिखलाखाली गाडल्या गेल्या.
अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
दरम्यान, मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कचऱ्यांच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं. यानंतर कचऱ्याचा डोंगर खाली कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांना प्रशासनाने याआधीच सूचना दिल्या होत्या. तसेच हा परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर काही नागरिकांनी आपल्या झोपडपट्या खाली देखील केल्या होत्या. अनेकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं होतं. त्यांनी धोक्याची ठिकाणी असलेली आपली घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते. मात्र, काही जणांनी झोपडपट्या रिकाम्या केल्या नाहीत. धोका आहे हे माहित असूनही अनेकजण तिथेच राहत होते. अशातच ही दुर्दैवी घटना घडली आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भीषण अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी अजूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा