Headlines

Bangladesh Rangpur Retire Indian Teacher Family Wife Husband Daughter and Son on the Spot Killed Preventing Accused from Getting Drunk; टेरेसवर नशा करण्यास रोखलं, संतापात दोघांनी हसत्या-खेळत्या परिवाराला क्षणार्धात संपवलं; बांगलादेशमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत


Bangladesh Rangpur Indian Family Murder : घराच्या छतावर नशा करताना रोखल्यामुळे कुटुंबातील चौघांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bangladesh Rangpur Indian Family Murder
बांगलादेश रंगपूर सेवानिवृत्त भारतीय शिक्षकाच्या कुटुंबाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृतसंस्था, ढाका : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका निवृत्त हिंदू शिक्षकासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह घरात आढळून आल्याचे वृत्त ‘द डेली स्टार’ने दिले आहे. गणपती चक्रवर्ती (वय ६५), प्रीतिलता चक्रवर्ती (वय ५०), आगामी चक्रवर्ती प्रार्थी (वय २३) आणि प्रियम चक्रवर्ती (वय १२ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी मुग्धो आणि सिद्धार्थ नावाच्या दोन चुलत भावांना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

संशयित आरोपी गुरुवारी रात्री शेजारच्या इमारतीवरून गणपती चक्रवर्तीयांच्या घराच्या छतावर शिरले आणि तिथे त्यांनी ‘याबा’ या अमली पदार्थाचे सेवन केले. छतावरून आवाज येत असल्याने गणपती चक्रवर्ती तिथे गेले आणि त्यांनी या दोघांना तिथे येण्याचे कारण विचारले. आपले कृत्य उघडकीस येईल या भीतीपोटी संशयितांनी चक्रवर्ती यांच्याच खांद्यावरील गमछ्याने त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर छतावरील गोंधळ ऐकून त्यांची पत्नी वरच्या मजल्याकडे गेली असता, आरोपींनी जिन्यावरच कापडाच्या साह्याने त्यांचीही गळा आवळून हत्या केला. याचदरम्यान, चक्रवर्ती यांच्या मुलाची आणि मुलीचीही हत्या करण्यात आली. रंगपूर शहरातील दासपारा भागातील बंद घरातून या चारही जणांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री ११:३०च्या सुमारास हस्तगत करण्यात आले आहेत.

Maharashtra Timesमुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना, कचऱ्याचा डोंगर झोपड्यांवरच कोसळला; भल्यापहाटे 22 जणांचा जागीच करुण अंत

घर बाहेरून बंद असल्यामुळे गूढ वाढलं

कुटुंबातील इतर सदस्य पोलिसांना बोलवतील, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे त्यांनी गणपती यांच्या मुलीचीही हत्या केली. तर झोपलेल्या लहान मुलाचाही आरोपींनी गळा दाबून हत्या केली. या चौघांचे मृतदेह शुक्रवारी त्यांच्या घरात आढळून आले. घर बाहेरून बंद असल्यामुळे सुरूवातीला या प्रकरणाचं गूढ वाढलं. गणपती आणि त्यांच्या मुलाच्या गळ्यावर दोरी किंवा कापड बांधलेलं मिळालं, या दोघांची हत्या गळा घोटून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. बांगलादेशच्या रंगपूर शहरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मोबाईल डिटर्जंटच्या पाण्यात बुडवले

गणपती यांचं अख्ख कुटुंब संपवल्यानंतर आरोपी फरार झाले नाहीत, तर दोघांनी घरात आंघोळ केली, फ्रीजमधून खजूर आणि काकडी खाल्ली. तसंच त्यांनी घरातील सामानही अस्थाव्यस्थ केलं, ज्यामुळे चोरीच्या उद्देशातून हत्या झाल्याचं वाटेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही शुक्रवारचा नमाझ व्हायच्या आधीच घरातून निघाले, जेणेकरुन रस्त्यावर लोकांची गर्दी कमी असेल. तसंच आरोपींनी कुटुंबाचे मोबाईल फोनही त्यांच्यासोबत नेले होते. हे फोन आरोपींनी डिटर्जंटच्या पाण्यात बुडवले, ज्यामुळे पुरावे नष्ट होतील, पण याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थ आणि मुग्धो यांना पकडलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा