Headlines

Bhandara Accident: लग्न समारंभासाठी जाताना अनर्थ; भंडाऱ्यात स्कॉर्पिओ कार उलटली, सात वऱ्हाडी गंभीर जखमी – seven wedding guests injured in horrific accident in bhandara lakhandur taluka scorpio overturns


Bhandara Accident News: लाखांदूर तालुक्यातील तई-बोथली फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ उलटून सात वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

bhandara accident
भंडारा अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: लाखांदूर तालुक्यातील बारव्हा-तईमार्गे नागपूरकडे निघालेल्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओ (एमएच ३१ डीके २५८२) ला तई/बोथली फाट्याजवळ भीषण अपघात झाला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात सात वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

पंकज शामराव मेंढे (वय ४५), शीतल पंकज मेंढे (वय ४०), माधुरी ईश्वरदास भेंडारकर (वय ५८), छाया भूपेश ब्राह्मणकर (वय ४५), रेखा केवळराम हेमने (वय ६३), केवळराम भदूजी हेमने (वय ७२) व यशस्वी प्रकाश मेंढे (वय १२, सर्व रा. नागपूर), अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण विवाह समारंभासाठी गेले होते.

Maharashtra TimesRaigad News : पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी
अपघात होताच परिसरातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. तई येथील युवकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचवेळी वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णालय अंधारात बुडाले होते.

मोबाइलसह वाहनांच्या लाइटमध्ये उपचार
पालांदूर ग्रामीण रुग्णालयात वीज नसल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरामे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाइलच्या टॉर्च तसेच चारचाकी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशात जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अत्यावश्यक आरोग्यवाहिनीद्वारे सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. पालांदूर ग्रामीण रुग्णालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा येथील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे.

Maharashtra TimesHSRP ला पुन्हा मुदतवाढ, आता दीड महिन्यांचा अवधी; पाटीचा दर्जा खराब, भुर्दंडावर वाहन चालक-मालक संतापले
गेल्या २० महिन्यांपासून स्वतंत्र विद्युत फीडर, जनरेटर व इन्व्हर्टरची मागणी करण्यात येत आहे. मात्र, निधीअभावी हा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणा अक्षरशः अंधारात काम करीत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा