Headlines

श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी, पण चर्चा प्लेइंग-११पेक्षा वेगळ्याच मुद्द्याची; गंभीर कशावरुन नाराज?


Gautam Gambhir News : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी गंभीरने पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. याशिवाय त्याने एका कारणावरुन नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाला गंभीर?

Gautam Gambhir News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा आपल्या रोखठोक शैलीत बोलताना पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेत गंभीरने सोशल मीडियावरील टीका, संघाची कामगिरी, दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि खेळाडूंच्या दुखापती अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे हे माझे काम नाही’, असे म्हणत त्याने टीकाकारांना थेट उत्तर दिले.

‘ट्रॉफी जिंकणं माझं काम’

सोशल मीडियावरील टीकेबाबत गंभीर म्हणाला, “माझं मुख्य काम ट्रॉफ्या जिंकणं आहे, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणं नाही. लोकांना खूश ठेवणं हे माझं काम नाही.” टीम इंडियाच्या सध्याच्या स्थितीवरही त्याने भाष्य केले. भारतीय संघ सध्या नव्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे क्रमवारीतील चढ-उतारांकडे फारसे लक्ष देत नसल्याचे गंभीरने स्पष्ट केले. इंग्लंड दौऱ्यानंतर संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याचेही त्याने सांगितले.

Maharashtra TimesDuleep Trophy 2026-27 : एकाला स्वतःला सिद्ध करायचंय, दुसऱ्याला टीम इंडियात परतायचंय; दुलीप ट्रॉफीत कोण दाखवणार दम?

दोन कसोटींच्या मालिकेवर गंभीर नाराज

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर गंभीरने नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, कसोटी मालिका किमान तीन सामन्यांची असायला हवी. कारण पहिलाच सामना गमावल्यानंतर दोन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमनाची संधी जवळपास संपते. यावेळी गंभीरने ऑस्ट्रेलियातील मालिकेचे उदाहरण दिले. भारत ०-१ ने पिछाडीवर असतानाही तीन सामन्यांच्या मालिकेमुळे पुनरागमन करून मालिका २-१ ने जिंकू शकला, असे त्याने सांगितले.

प्लेइंग 11 मध्ये बदल होणार?

खेळाडूंच्या दुखापतींबाबतही गंभीरने चिंता व्यक्त केली. या मालिकेत अनेक प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले. संघातील सर्वोत्तम खेळाडूंनी अधिकाधिक क्रिकेट खेळणे आणि सातत्य राखणे गरजेचे असल्याचे गंभीर म्हणाला.

Maharashtra TimesJubin Bharucha : राजस्थानच्या गोटात सर्वात मोठा ‘गेम’; वैभवसारखा हिरा पारखणारा ‘मास्टरमाइंड’ मुंबईने अलगद पळवला!
दरम्यान, दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग 11 बाबत गंभीरने स्पष्ट माहिती दिली नाही. मात्र, त्याने कुलदीप यादवचे कौतुक केले. मैदानात त्याचा किती आणि कसा वापर करायचा, हा कर्णधाराचा निर्णय असल्याचे गंभीरने सांगितले.

कुलदीप सलग दोन दिवस सरावासाठी उपस्थित नसल्याने त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसेच ध्रुव जुरेलच्या जागी सर्फराज खानला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.