Headlines

फुटबॉलचा देव मेस्सीला मोठा धक्का! भर मैदानात भिडला, रागाच्या भरात केलेली भयंकर चूक महागात पडली


Lionel Messi News : इंटर मियामीचा स्टार लिओनेल मेस्सी याच्यावर फिलाडेल्फिया युनियनविरुद्धच्या सामन्यातील प्रकारामुळे MLSने दंडाची कारवाई केली आहे. नेमकं मैदानात काय घडलं आणि मेस्सीवर कोणत्या नियमाखाली कारवाई झाली?

Lionel Messi Fined
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : लिओनेल मेस्सी फुटबॉल जगतातील एक अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव. पण नेहमी शांत वाटणाऱ्या याच मेस्सीला मेजर लीग सॉकर (MLS) मध्ये आता एक मोठा धक्का बसला आहे. फिलाडेल्फिया युनियनविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडू क्विन सुलिवन ( Quinn Sullivan ) याच्याशी भर मैदानात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे आणि गैरवर्तणुकीमुळे मेस्सीवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दंडाची रक्कम अद्याप उघड करण्यात आलेली नाही. याच सामन्यात मियामीचा डिफेंडर इयान फ्रे यालाही सुलिवनसोबतच्या गैरवर्तनाबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर MLS ची मोठी कारवाई

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मेस्सी आणि सुलिवन यांच्यात मैदानाच्या मध्यभागी बाचाबाची झाली. यावेळी रागाच्या भरात मेस्सीने सुलिवनच्या मानेवर आणि डोक्यावर हात मारल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे, मैदानावरील पंचांनी (Referee) त्यावेळी मेस्सीला कोणतेही कार्ड दाखवले नव्हते. मात्र, सामन्यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांनी व्हिडिओ फुटेजची कसून पाहणी केली, तेव्हा मेस्सीने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चेहरा, डोके किंवा मानेला हात न लावण्याच्या कडक नियमाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.

मेस्सीने हा नियम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. या नियमांतर्गत त्याला दुसऱ्यांदा शिक्षा मिळाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये न्यूयॉर्क सिटी एफसी (NYCFC) विरुद्धच्या सामन्यातही मेस्सीवर याच नियमाखाली कारवाई करण्यात आली होती.

Maharashtra TimesJubin Bharucha : राजस्थानच्या गोटात सर्वात मोठा ‘गेम’; वैभवसारखा हिरा पारखणारा ‘मास्टरमाइंड’ मुंबईने अलगद पळवला!

सामन्याच्या अखेरीस राडा अन् ‘रेड कार्ड’चा ड्रामा!

या सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते. पेनल्टी बॉक्सच्या दिशेने चेंडू घेऊन धावणाऱ्या सुलिवनशी मियामीचा इयान फ्रे अचानक भिडला आणि त्याने थेट त्याची मान पकडली. या धक्कादायक वर्तनासाठी फ्रेवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर, मैदानाबाहेर झालेल्या हाणामारीमुळे मियामीचा यानिक ब्राइट आणि फिलाडेल्फियाचा कावन सुलिवन यांना पंचांनी थेट ‘रेड कार्ड’ दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, फिलाडेल्फियाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना, MLS च्या तपास पथकाने सर्वांच्या सहमतीने कावन सुलिवनवरील रेड कार्ड आणि एका सामन्याची बंदी उठवली आहे. त्यामुळे तो आता पुढचा सामना खेळू शकणार आहे.

Maharashtra TimesZolani Tete death : ‘देशाने महान फायटर गमावला’; क्रीडा मंत्री भावुक, 38 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनचा धक्कादायक शेवट, काय घडलं?
दरम्यान, या संपूर्ण राड्यात मियामीचे खेळाडू लिओनेल मेस्सी आणि इयान फ्रे हे बंदीच्या कारवाईतून थोडक्यात बचावले असले, तरी त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याशिवाय, अटलांटा युनायटेडविरुद्धच्या सामन्यात फाऊल होण्याचे खोटे नाटक केल्याप्रकरणी मिनेसोटा युनायटेडचा डिफेंडर अँटनी मारकनिच याच्यावरही लीगने दंडाचा बडगा उगारला आहे.